मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिक महाराष्ट्रातल्या रसिकांच्या मनातला ताईत बनली. राणादा, अंजली या जोडीवर रसिकांनी अमाप प्रेम केलं. म्हणून ते टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर होते. आजही ही मालिका पाहिली जाते. या जोडीवर रसिकांनी प्रेम केलंच. त्यासोबत या घरात आणखी एक जोडी होती ती राज आणि नंदिनीची. नंदिनीचा कावेबाज स्वभावही रसिकांना आवडला. म्हणून नंदिनी लोकप्रिय झाली.


नंदिनी साकारणारी अभिनेत्री आहे धनश्री काडगांवकर. मालिकेतला तिचा ट्रॅक संपून जवळपास आठपेक्षा जास्त महिने उलटून गेले आहेत. तरीही रसिकांचं तिच्यावरचं प्रेम कायम आहे. धनश्री सध्या पुण्यात असून लॉकडाऊन संपण्याची वाट पाहते आहे. तरीही घरबसल्या अनेक गोष्टी ती सतत करत असते. सोशल मीडियावर विशेषत: इन्स्टाग्रामवर तिने टाकलेले फोटो बरेच व्हायरल होतात. असेच काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.


धनश्रीने काही दिवसांपूर्वी आपले स्टाईलबाज फोटो इन्स्टावर टाकले. अलिकडे तिने पिवळ्या धम्मक टीशर्टमधले काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. यात तिने टीशर्ट परिधान केला असून हाता सॅंडल्स अडकवलेला असा एक फोटो आहे. तर दुसरा फोटो थोड्या वेगळ्या पोजमधला आहे. धनश्री सर्वांना नंदिनी म्हणूनच माहित आहे. या मालिकेत ती गावरान रुपात दिसली. तिची कोल्हापुरी भाषा आणि तिचा गावरान अवतार लोकांना भावला. आता मालिकेतला ट्रॅक संपल्यानंतर तिने पुन्हा आपला नेहमीचा मॉडर्न अवतार धारण केला आहे. हे फोटो हा त्याचाच भाग. धनश्रीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात दोन्ही बाजूंनी कमेंट आलेल्या दिसतात. काहींना तिचा हा अवतार आवडला आहेत तर काहींनी मात्र असा लूक तिला सूट होत नसल्याचं म्हणत ट्रोल केलं आहे.





धनश्री सातत्याने स्वत:वर प्रयोग करत असते. तिच्या इन्स्टा अकाऊंटवर गेल्यानंतर ही बाब लक्षात येते. तिने त्याआधीही काळ्या टीशर्टमधले फोटो आपल्या अकाऊंटवर टाकले होते. त्यालाही लोकांचा असाच प्रतिसाद होता. धनश्री एक उत्तम अभिनेत्री आहे. म्हणूनच मालिकेतून तिने सोडलेली छाप अद्याप कायम आहे. असं असलं तरी कलाकार म्हणून तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे. तिच्या आवडीनिवडी आहेत हे मान्य करावंच लागेल.