स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंनी शिवबांना हाताशी घेऊन पुण्याची पुनर्बांधणी सुरू केली आहे. शहाजी राजांनी पाठवलेली कवड्यांची माळ मिळवण्यास आपण पात्र आहोत, हे शिवबांनी सिद्ध केलं आणि भोसल्यांचं लेणं असलेली कवड्यांची माळ अभिमानानं परिधान केली.


दरम्यान शिवबांच्या आयुष्यातल्या महत्वपूर्ण घटना स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. लवकरच शिवबा आणि सईबाई यांचा विवाह-सोहळा पार पडणार आहे. शिवबा आणि सईबाई यांच्या लग्नाची रंजक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


टीआरपीत स्टार प्रवाहची बाजी! झी मराठी दुसऱ्या तर कलर्स मराठी तिसऱ्या स्थानी


जिजाऊंनी फलटणचे निंबाळकर यांच्या सईबाईंशी शिवबांचा विवाह ठरवला आहे. याला बरीच राजकीय कारणं होती. स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेतलं ते एक महत्त्वाचं पाऊल होतं. शिवबा आणि सईबाईंच्या लग्नाला शहाजीराजे बंगळूरहून पोहचू शकले नाहीत, तेव्हा जिजाऊंनी एकट्यांनी शिवबांच्या लग्नाची जबाबदारी लीलया पेलली. ही सोयरीक जुळावी ह्यासाठी जिजाऊ जितक्या प्रयत्नशील होत्या, तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रयत्न ही सोयरीक जुळू नये, ह्यासाठी शत्रू पक्ष करत होता. पण आजपासून साधारण पावणे चारशे वर्षांपूर्वी अमीनसारखा बलाढ्य शत्रू समोर असताना एकट्या स्त्रीनं शिवबांचं लग्न व्यवस्थित पार पाडलं होतं आणि हा रोमहर्षक आणि चित्तथरारक इतिहास आता या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर प्रेक्षकांना 'विवाह-सप्ताह' पाहायला मिळणार आहे.


Kangana Ranaut vs BMC | कंगना रनौत- बीएमसी वादावर सुनावणी पूर्ण; मुंबई हायकोर्टाने निकाल राखून ठेवला