Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या घरातून (Bigg Boss Marathi New Season) अरबाज पटेलने (Arbaz Patel) निरोप घेतला आहे. प्रेक्षक मागील अनेक दिवसापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये असताना अरबाज हा घराबाहेर पडला. त्यावेळी निक्की अगदी ओक्साबोक्शी रडली. त्यानंतर सोशल मीडियावरही कमेंट्स पाऊस आला आहे. 


अरबाजला घराबाहेर पाहून बिग बॉस प्रेमींना बराच आनंद झालाय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. तसेच बिग बॉसचेही प्रेक्षकांनी आभार मानले आहेत. अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांचा खेळ सुरुवातीपासून कुणाला आवडत नाहीये. त्याचप्रमाणे आता अरबाजनंतर निक्कीचा नंबर असल्याचंही प्रेक्षक म्हणत आहेत.                                                                   


निक्की धाय मोकलून रडली


दरम्यान अरबाज बाहेर पडल्यानंतर निक्की अक्षरश: धाय मोकलून रडल्याचं पाहायला मिळालं. तसेच अरबाजला घराबाहेर पाठवू नका अशी वारंवार विनंती ती बिग बॉसला करत होती. आता अरबाज गेल्यानंतर निक्की घरात एकटी पडणार आहे. कारण घरातील कोणत्याच सदस्याला तिचा स्वभाव आवडत नाही. त्यामुळे आता निक्की कुणाला जवळ करणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.   




कमेंट्सचा पाऊस


सोशल मीडियावर कमेंट करत एकाने म्हटलं की, सगळ्या एपिसोड पेक्षा आजचा एपिसोड बघणायत लई मजा आली.. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला... आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की,आम्ही तुला केव्हापासून गुडबाय बोलत होतो, शेवटी बिग बॉसने ते काम केलंच... एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आता उद्यापासून निक्कीचं तोंड बघायला मज्जा येणार... 






ही बातमी वाचा : 


Arbaz Patel : निक्कीमुळे कॅप्टन झाला, पण नशिबाने खेळच संपवला; अरबाज पटेल बिग बॉसच्या घराबाहेर; निक्की धाय मोकलून रडली