मुंबई : 'एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू' म्हणत खोटारडेपणाचे धडे गिरवणाऱ्या ललिता जहागिरदारची सद्दी लवकरच संपणार आहे. झी मराठी वाहिनीवर नील आणि स्वानंदी या जोडीची गाजलेली 'नांदा सौख्यभरे' ही मालिका येत्या महिनाअखेर निरोप घेणार असून नवी मालिका लवकरच रुजू होणार आहे.


'तुझ्यात जीव रंगला' असं नव्या मालिकेचं शीर्षक असून 3 ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता या मालिकेचं प्रक्षेपण होणार आहे. दोन नवे चेहरे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सुहास परांजपे, ऋतुजा बागवे, चिन्मय उद्गीरकर यांच्या मुख्य भूमिका असलेली नांदा सौख्यभरे ही मालिका गेल्या वर्षी सुरु झाली होती. सासू-सूनेच्या टिपीकल नात्यावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.



एक ऑक्टोबर रोजी 'नांदा..'चा अंतिम भाग प्रक्षेपित होणार असून मालिकेचा शेवट कसा असेल, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. स्वानंदी नवऱ्यासमोर आपल्या सासूचा खोटारडेपणा उघडा पाडणार, की काय होणार याबाबत उत्कंठा शीगेला पोहचली आहे. झी मराठीवर काहीच दिवसांपूर्वी 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सुरु झाली होती.