कटक : ओडिया टीव्ही अभिनेत्री लक्ष्मीप्रिया बेहरा उर्फ निकिताचा टेरेसवरुन पडल्यामुळे मृत्यू झाला. मात्र सासू आणि पतीने तिची हत्या केल्याचा आरोप लक्ष्मीप्रियाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे.
लक्ष्मीप्रियाच्या वडिलांनी उदिशातील चौलीगंज पोलिसात तिचा पती आणि सासूविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कौटुंबीक वादामुळे दोघांनी लक्ष्मीप्रियाची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. पोलिसांनी तिचा पती लिपन साहूला चौकशीसाठी अटक केली आहे.
लक्ष्मीप्रियाने 25 नोव्हेंबर 2016 रोजी लिपनसोबत विवाह केला होता. त्यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे.
लक्ष्मीप्रिया राहत्या घराच्या टेरेसवरुन पडल्यामुळे तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मालवली. पोस्टमार्टम अहवालानंतर तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.
लक्ष्मीप्रियाने शंभरपेक्षा अधिक ओडिया अल्बममध्ये काम केलं आहे. एसीपी निकिता या मालिकेत तिने साकारलेल्या मुख्य भूमिकेनंतर तिला 'निकिता' हीच ओळख मिळाली. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं होतं.
टीव्ही अभिनेत्रीचा मृत्यू, सासू-पतीवर हत्येचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2019 10:55 AM (IST)
ओदिशातील टीव्ही अभिनेत्री लक्ष्मीप्रिया बेहेरा उर्फ निकिताचा मृत्यू झाला. कौटुंबीक वादामुळे सासू आणि पतीने लक्ष्मीप्रियाची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -