जसलीनसोबतच्या नात्याबद्दल अनुप जलोटांचा गौप्यस्फोट
एबीपी माझा वेब टीम | 29 Oct 2018 01:28 PM (IST)
वीकेण्डच्या वारमध्ये या सीजनचा सर्वात मोठा ट्विस्ट बघायला मिळाला. या ट्विस्टमुळे सुरुवातीला चर्चेत असणारे अनुप जलोटा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले.
मुंबई : 'बिग बॉस 12' हा रिअॅलिटी शो ज्येष्ठ गायक अनुप जलोटा आणि त्यांची २७ वर्षीय प्रेयसी जसलीन यांच्यामुळे चांगलाच गाजत आहे. त्यातच घराबाहेर पडल्यानंतर भजनसम्राट अनुप जलोटा यांनी जसलीनसोबतच्या नात्याबद्दल गौप्यस्फोट केला आहे. “जसलीन आणि माझ्यात फक्त गुरु-शिष्याच नातं आहे. जसलीनचा मला फोन आला की, बिग बॉसमध्ये आपल्याला विचित्र जोडीच्या रुपात सहभागी व्हायचं आहे आणि मी तिला होकार दिला,” असं अनुप जलोटा यांनी सांगितलं. वीकेण्डच्या वारमध्ये या सीजनचा सर्वात मोठा ट्विस्ट बघायला मिळाला. या ट्विस्टमुळे सुरुवातीला चर्चेत असणारे अनुप जलोटा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. तसंच या आठवड्यात डबल एव्हिक्शनमध्ये अनुप जलोटा यांच्यासोबत सबा खान देखील बाहेर पडली. यानंतर घरातून बाहेर पडताच अनुप जलोटांनी बिग बॉसच्या संबंधित अनेक गौप्यस्फोट केले. जसलीनसोबतच्या संबंधांसंदर्भात स्पष्टीकरण देताना जलोटा म्हणाले की, “मला माहित होतं की पुढे जाऊन लोक आमच्याबद्दल प्रश्न उपस्थित करतील. पण माझ्या आणि जसलीनमध्ये फिजीकल संबंध नसून म्युझिकल संबंध आहेत. मी सुफी संगीतकार आहे, जो शरीराच्या पलिकडचा विचार करत असतो. जसलीनचे वडील माझे चांगले मित्र आहेत आणि मी त्यांना आधीच सगळं सांगितलं होतं.”