मुंबई : 'बिग बॉस'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री डॉली बिंद्राचा पाठलाग केल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील खार पोलिसांनी 27 वर्षीय अब्दुल शेखला बेड्या ठोकल्या.
अब्दुल वांद्र्यापासून खारपर्यंत डॉलीचं 'स्टॉकिंग' करत असल्याचा आरोप आहे. डॉलीचा पाठलाग करत अब्दुल खारला आला, तेव्हा गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याची धरपकड केली.
'मी रात्री 1.40 वाजता वांद्र्याला एका लग्नाहून निघाले होते. त्यावेळी तो माणूस त्याच्या गाडीने माझा पाठलाग करत होता. मी जिथे जिथे फोन करण्यासाठी थांबत होते, तिथे तोही थांबत होता.' असा आरोप डॉली बिंद्राने केला.
'तो फक्त माझा पाठलागच करत नव्हता, तर काहीतरी हातवारेही करत होता. मी खारला लिंकिंग रोडवरील पोलिसांना त्याच्याबद्दल सांगितलं. त्याला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.' असं डॉली बिंद्राने सांगितलं.
अब्दुलच्या मालकीचा कपड्यांचा कारखाना आहे. खार पोलिसांनी अटक करुन त्याला जामीन मंजूर केला.
डॉली बिंद्राचा पाठलाग करणारा तरुण अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2018 12:45 PM (IST)
'मी रात्री 1.40 वाजता वांद्र्याला एका लग्नाहून निघाले होते. त्यावेळी तो माणूस त्याच्या गाडीने माझा पाठलाग करत होता.' असा आरोप डॉली बिंद्राने केला.
![डॉली बिंद्राचा पाठलाग करणारा तरुण अटकेत डॉली बिंद्राचा पाठलाग करणारा तरुण अटकेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/21124435/Actress-Dolly-Bindra-GettyImages-138039361.jpg)
सौजन्य : गेट्टी इमेजेस
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -