मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक-2017 च्या फायनलमध्ये मिताली राजच्या क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करुन, सर्व भारतीयांची मनं जिंकली. यानंतर मितालीची महिला ब्रिगेड रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी होत आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग नुकतच पूर्ण झालं असून, याचं प्रक्षेपण 1 सप्टेंबर रोजी सोनी टीव्हीवरुन होणार आहे.
या कार्यक्रमात महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजसह इतर 6 खेळाडूंनी सहभाग घेतला. एका मीडिया रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात मितालीच्या टीमने एकूण 6 लाख 40 हजार रुपये जिंकले. जिंकलेली ही सर्व रक्कम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या हैदराबादमधील 'प्रयास' या संस्थेला देण्यात येणार आहेत.
मिताली राज ही 'प्रयास' स्वयंसेवी संस्थेची ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे. ही संस्था महिला अत्याचाराविरोधात काम करते. या संस्थेला आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
यात मितालीसह हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मानधना, पूनम राऊत, झूलन गोस्वामी आणि दीप्ती शर्मा यांनी सहभाग घेतला.
महिला विश्वचषकानंतर मितालीची महिला ब्रिगेड केबीसी गाजवणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2017 03:45 PM (IST)
मिताली राजच्या क्रिकेट टीममधील सहा खेळाडूंनी रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाचं शूटिंग नुकतच पूर्ण झालं असून, याचं प्रक्षेपण 1 सप्टेंबर रोजी सोनी टीव्हीवरुन होणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -