मुंबई : सोनी टीव्हीवरील 'पहरेदार पिया की' या मालिकेची सध्या जोरदार चर्चा आहे. ही मालिका तातडीने बंद करा, अशी मागणी केली जात आहे. आता माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी लोकांच्या मागणीवर विचार करत ब्रॉडकास्टिंग कंटेंट कम्पलेंट्स काऊन्सिलकडे हे प्रकरण सोपवलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बीसीसीसीला या मालिकेवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
'पहरेदार पिया की' मालिकेविषयीने लोकांमध्ये फार रोष आहे. मानसी जैन नावाच्या एका तरुणीने change.org वेबसाईटवर मालिकेवर बंदी घालण्यायाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आतापर्यंत सुमारे 50 हजारांपेक्षा जास्त लोकांनी स्वाक्षरी केली आहे.
'पहरेदार पिया की मालिकेत एका 9 वर्षाच्या मुलाला त्याच्या दुप्पट 18 वर्ष वयाच्या मुलीचा पाठलाग करताना, तिच्या भांगात कुंकू भरताना दाखवलं आहे. ही मालिका रात्री 8:30 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होते, हा फॅमिली टाईम असतो. या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मानसिकेतवर परिणाम होईल. ही मालिका पाहून आमच्या मुलांच्या मनावर परिणाम होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. मालिका बंद करण्यासाठी या याचिकवर स्वाक्षरी करा, असं या तरुणीने याचिकेत म्हटलं आहे. हीच याचिका स्मृती इराणी यांना पाठवण्यात आली आहे.
'पहरेदार पिया की' ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. एका 18 वर्षांच्या तरुणीचं 9 वर्षांच्या मुलासोबत लग्न होतं. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमध्ये सुहागरात तसंच कुंकू लावण्याचे सीन दाखवले होते. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता.
स्मृती इराणींची 'पहरेदार पिया की'विरोधात कारवाई, मालिका बंद होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2017 02:42 PM (IST)
‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. एका 18 वर्षांच्या तरुणीचं 9 वर्षांच्या मुलासोबत लग्न होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -