Akanksha Puri Entered In Mika Di Vohti : लोकप्रिय गायक मिका सिंहचा (Mika Singh) 'स्वयंवर मिका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या होत्या. स्वयंवरात सहभागी झालेल्या मुली मिकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असताना आता या कार्यक्रमात मिकाची एक्स गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीची (Akanksha Puri) वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. 


आकांक्षा पुरी एक उत्तम स्पर्धक असून मिकाचे लक्ष ती कसे वेधते याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मिका सिंहच्या स्वयंवरात सहभागी झालेल्या मुली एकापेक्षा एक आहेत. आता आकांक्षाची 'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात एन्ट्री होणार असल्याने या कार्यक्रमाचा टीआरपीदेखील वाढला आहे. आकांक्षाच्या एन्ट्रीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


12 मुली मिकीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आकांक्षा एक उत्तम स्पर्धक असल्याने आता प्रेक्षकांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. सध्या मिका सर्व मुलींना जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मिका कोणत्या मुलीची जोडीदार म्हणून निवड करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 


मराठी मुलगी म्हणून ध्वनी पवार बाजी मारणार का? 


स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची प्रेयसी म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे. तसेच मराठी मुलगी म्हणून ध्वनी पवार बाजी मारणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या कार्यक्रमात ध्वनीसोबत ध्वनीसोबत सोनल तीलवानी, प्रांतिका दास, चंद्राणी दास, बुशरा शेख, आश्लेषा रावले अशा 12 मुली सहभागी झाल्या आहेत.


संबंधित बातम्या 


Swayamvar Mika Di Vohti : हिना खाननं मिका सिंहच्या स्वयंवरातील स्पर्धकांना दिली ट्रेनिंग; शिकवला खास कॅट वॉक


Mika Di Vohti : मिका सिंहला 'ही' मुलगी वाटते सर्वात बेस्ट? 'स्वयंवर : मिका दी वोटी'मध्ये फराह खान घेणार मुलींची परीक्षा