Mi Honar Superstar Jallosh Juniorscha Grand Finale : मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्सचा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) या छोट्या पडद्यावरील डान्स शोचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या शोमध्ये विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आता या स्पर्धेचा विजेता कोण ठरणार आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा आणि  सुख म्हणजे नक्की काय असतं! मालिकेतील गौरी या स्पेशल परफॉर्मन्स करणार आहेत. त्यांच्या परफॉर्मन्सचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा  ही 'डी टू डी क्वीन्स’  या ग्रुपसोबत परफॉर्म करणार आहे. तर सुख म्हणजे नक्की काय असतं! मालिकेतील गौरी ही ‘झीरो डिग्री क्रू’ या ग्रुपसोबत परफॉर्मन्स करणार आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, गौरी आणि ‘झीरो डिग्री क्रू’चा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर अंकुश चौधरी हा त्यांचे कौतुक करतो. 


पाहा प्रोमो










सुख म्हणजे नक्की काय असतं! मालिकेतील गौरी ही भूमिका अभिनेत्री गिरिजा प्रभू ही साकारते तर रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा ही भूमिका  रेश्मा शिंदे साकारते. 


3 जून आणि 4 जून रोजी पाहता येणार महाअंतिम सोहळा


'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमात अभिनेता अंकुश चौधरी परीक्षकाच्या भूमिकेत आहे. तर समृद्धी केळकर आणि चिमुकली साईशा साळवी हा कार्यक्रम होस्ट करत आहे. तर फुलवा खामकर आणि वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा   3 जून (शनिवार) आणि  4 जून (रविवार) रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्सचा' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


 संबंधित बातम्या


Mi Honar Superstar Jallosh Juniorscha : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार महाअंतिम सोहळा! जाणून घ्या कधी होणार ग्रॅंड फिनाले...