Saorabh Choughule: अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh chaugule) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. “जीव माझा गुंतला” (Jeev Majha Guntala) या मालिकेमुळे सौरभला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत सौरभ हा मल्हारची भूमिका साकारतो. सौरभनं नुकतच त्याच्या आईला खास सरप्राइज दिलं आहे. सौरभनं त्याच्या आईचा वाढदिवस मुंबईतील ताज हॉटेलमध्ये येथे साजरा केला. याबाबत सौरभनं एक पोस्ट शेअर केली आहे.
सौरभनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सौरभ हा त्याच्या आईला ताज हॉटेमध्ये घेऊन जातो. तिथे सौरभ त्याच्या आईचा वाढदिवस साजरा करतो. या व्हिडीओला सौरभनं कॅप्शन दिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी. माझ्या सर्व आनंदासाठी माझे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही केलेल्या सर्व प्रयत्नांची परतफेड करण्याची वेळ आली आहे...माझं तुझ्यावर प्रेम आहे मम्मी...'
सौरभनं त्याच्या ताज हॉटेलमधील त्याच्या आईसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'काही दिवसांपूर्वीच मम्मीचा वाढदिवस झाला दरवर्षी आहे माझ्या वाढदिवसाला काही ना काही तरी स्पेशल करायची जसं शॉपिंग करून देणार किंवा एक मोबाईल घेऊन देणार.
गेले दोन वर्ष कोल्हापुरात शूट करत होतो, म्हणून तिच्या वाढदिवसाला राहता नाही आलं आणि आमचा शो मुंबईत आला तेव्हा ठरवलं की मम्मीसाठी काहीतरी स्पेशल करायचं पण करणार काय काहीच कळत नव्हतं ,असंच एक प्लान केला की मम्मीला ताज हॉटेल ला घेऊन जायचं. तेही तिला न सांगता- एक सरप्राईज.
फोटो काढायला जातोय मरीन लाईन्सला असं सांगून जसं मरीन लाईन जवळ आलं तिच्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि तिथेच ताज हॉटेलच्या दारात जाऊन उघडली.
तिला कळेना की आपण कुठे आलोय, पण जेव्हा तिला सांगितलं तिला काय रिऍक्ट करावा ते कळलंच नाही!
पुढे पोस्टमध्ये सौरभनं लिहिलं, 'आत मध्ये जाऊन फूड ऑर्डर करणं सोडून तिने सगळ्यात आधी आपल्या सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना फोन करून सांगितलं की सौरभ मला ताज हॉटेल ला घेऊन आलाय बर्थडे साठी तिला इतकं आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. ती ऑफिस ला ताज जवळच होती. पण ती कधी ताज मध्ये गेली नाही. आज गेली तर आनंद तिच्या चेहऱ्यावरून झळकत होता. फोटो काढायची अवाड म्हणून हॉटेल मध्ये सगळ्या ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यात फोटोज् काढले. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहिलंय. तिला असं आनंदी बघून मी अजून काय करू हिच्यासाठी तेच कळत नव्हतं पण एक नक्की ही एक सुरुवात आहे अजून खूप काही करायचंय तुझ्यासाठी मम्मी..PS. तिला सरप्राइज खूप आवडलं हे घरी गेल्यावर माझ्या रूम मध्ये मी कार पार्क करून येण्याआधीच AC चालू करून ठेवला होता ह्यावरून कळलं.'