Fire Broke Out On Meet Set : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मीत : बदलेगी दुनिया की रीत' (Meet Badlegi Duniya KI Reet) या मालिकेच्या सेटवर आग लागली आहे. अचानक आग लागल्यामुळे सेटवरील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 'मीत' या मालिकेतील अभिनेत्री आशी सिंहने (Ashi Singh) यासंदर्भात माहिती दिली आहे. 


'मीत : बदलेगी दुनिया की रीत' (Meet Tv Serial) या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी आशी सिंहने आग लागल्याची माहिती दिली आहे. शॉट सर्किटमुळे आग लागली असल्याचं अभिनेत्री म्हणाली. सेटवरील एक खोली जळून खाक झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 'मीत : बदलेगी दुनिया की रीत' या मालिकेत आशी सिंह आणि शगुन पांडे मुख्य भूमिकेत आहेत.


शॉर्टसर्किटमुळे लागली आग.... 


'मीत : बदलेगी दुनिया की रीत' या मालिकेचा सेट ठाण्यातील मीरा रोड परिसरात आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, मालिकेच्या सेटवरील एका खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर या खोलीतील सर्व कॅमेरे आणि उपकरणे खोलीतून बाहेर काढण्यात आले. पण या आगीत ती संपूर्ण खोली मात्र जळून खाक झाली आहे. आता ही आग नक्की कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. 


आशी सिंहने (Ashi Singh) दिली आग लागल्याची माहिती


'मीत : बदलेगी दुनिया की रीत' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री आशी सिंहने आग लागल्याची माहिती दिली आहे. ती म्हणाली,"मीत : बदलेगी दुनिया की रीत' या मालिकेच्या सेटवर आग लागली. पण लगेचच ही आग आटोक्यात आणण्यात आली. ज्या खोलीत आग लागली, त्या खोलीत त्यावेळी कोणी नव्हतं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता आग आटोक्यात आल्याने लवकरच शूटिंगला सुरू होईल". 


'मीत : बदलेगी दुनिया की रीत' मालिकेबद्दल जाणून घ्या... (Meet Badlegi Duniya KI Reet Serial Details)


'मीत : बदलेगी दुनिया की रीत' ही छोट्या पडद्यावीरल लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत आशी सिंह आणि शगुन पांडे मुख्य भूमिकेत आहेत. 'बोकुल कोठा' या बंगाली मालिकेची ही मालिका रिमेक आहे. या मालिकेतील नाट्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. वैभव सिंह या मालिकेचं दिग्दर्शन करत आहे. 


संबंधित बातम्या


Marathi Serial : "अप्पी आमची कलेक्टर" ते 'लवंगी मिरची'; मराठी मालिकांमध्ये रंगणार वटपौर्णिमा विशेष भाग