Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अप्पीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे.
मुलाखत घेणाऱ्यांनी अप्पीला प्रश्न विचारलं आहे,"छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?". या प्रश्नाचं उत्तर देत अप्पी म्हणाली की, मॅडम वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे संदर्भ आहेत. अनेक इतिहासकारांनी वेगवेगळे अंदाज लावले आहेत. अंदाजे त्यांची त्यांची उंची 5 फूट 5 इंच ते 5 फूट 8 इंच एवढी असेल".
अप्पीच्या या उत्तरावर मुलाखत घेणारे म्हणतात की,"मला ठाम उत्तर हवं आहे". यावर उत्तर देत अप्पी म्हणते, मॅडम... 4 हजार 604 फूट उंच असलेला तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी काबीज केला आहे. साडे तिनशे वर्षाची गुलामी तोडून स्वराज्याचं तोरण बांधलं आहे. आता या माणसाची उंची आपण कसी मोजायची नाही का".
अप्पीच्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अप्पीच्या या व्हिडीओवर जय शिवराय, आमचा राजा होताच भारी, खूप छान उत्तर..लेखकाचं खूप कौतुक, अंगावर शहारे आले अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अप्पीला तिच्या कठीण मुलाखतीसाठी प्रेक्षक शुभेच्छा देत आहेत.
प्रश्नांच्या भडीमाराला अप्पी सामोरी जाणार?
तुम्हाला कलेक्टर का व्हावसं वाटत आहे? महात्मा फुलेंनी पुणे जिल्ह्यातील मुलीशीच का लग्न केलं? घर आणि ऑफिस दोन्हीचा सांभाळ करू शकाल का? बलात्कारी माणसाला फाशीची शिक्षा योग्य की अयोग्य? उद्या तुम्हाला कळालं तुमचे पती भ्रष्टाचारी आहेत तर? असे अनेक प्रश्न 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेच्या आगामी भागात मुलाखतकार अप्पीला विचारणार आहेत.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत उज्वल निकम आणि विश्वास पाटील यांची एन्ट्री
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत उज्वल निकम आणि विश्वास पाटील यांची एन्ट्री झाली आहे. अप्पीने युपीएससीची परीक्षा पास केली असून आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न साकार होणार आहे. पण त्यासाठी तिला मुलाखतीचा कठीण टप्पा पार करावा लागणार आहे. उज्वल निकम आणि विश्वास पाटील अप्पीची मुलाखत घेणार आहेत. आता कलेक्टर बनण्याचा कठीण टप्पा अप्पी पार करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या