मुंबई : झी मराठीवरील 'लक्ष्मी' अर्थात 'सौभाग्यवती'ची कायमची पाठवणी होणार आहे. कारण 'माझे पती सौभाग्यवती' ही मालिक लवकरच ऑफ एअर होणार आहे.


 

 

'माझे पती सौभाग्यवती'ची जागा आता 'खुलता कळी खुलेना' ही मालिका घेणार आहे. 18 जुलैपासून रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओमप्रकाश शिंदे आणि मयुरी देशमुख यांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे.

 

 

वैभव मांगले आणि नंदिता धुरी यांची प्रमुख भूमिका असलेली 'माझे पती सौभाग्यवती' मालिका 28 सप्टेंबर 2015 रोजी पहिल्यांदा प्रसारित झाली होती. मी लवकरच येतेय' आणि आता 'घरातील साखर संपलीय का', 'किती उशीर, थांबा जरा पिन लावतेय', या जाहिरातींमुळे 'माझे पती सौभाग्यवती'विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

 

 

मात्र मालिका सुरु झाल्यावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला 'सौभाग्यवती'ला काही जमलं नाही. शिवाय टीआरपी चार्टमध्येही ही मालिका कुठेच नव्हती. त्यामुळेच मालिकेचा गाशा गुंडाळला लागला, असं म्हटलं आहे.

 

 

या मालिकेत, वैभव मांगले, नंदिता धुरीसह अशोक शिंदे, रमेश भाटकर, उदय सबनीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

 

 

काय आहे मालिकेची कथा?
अभिनय क्षेत्रात नाव आणि काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यात घडणाऱ्या एका घटनेमुळे जे नाट्य घडतं, ते या मालिकेत पाहायला मिळत आहे. वैभव मालवणकर हा कलाकार कोकणातून मुंबईत आला असून त्याचं लग्न झालं आहे. चांगलं काम किंवा भूमिका मिळावी, यासाठी त्याची धडपड सुरु आहे. मात्र पुढे त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडते आणि त्याला 'स्त्री' पात्र रंगवावं लागतं. या माणसाला आयुष्यात पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही भूमिका कराव्या लागतात. आपली स्वत:ची ओळख पुसून नवीन ओळख त्याला निर्माण करावी लागते. यातून जे नाट्य, विनोद, प्रसंग घडतात ते या मालिकेत मांडण्यात आले आहेत.

 

नवी मालिका 'खुलता कळी खुलेना'