मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिका 'वारिस'मध्ये अंबाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आरती सिंह चक्क सेटवरच क्रिकेट खेळत होती.
क्रिकेट खेळणं आणि गोलंदाजी करणं तिला नेहमीच आवडतं. जेव्हा तिला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली तेव्हा आरतीनं आपली ही आवड वारिसच्या सेटवरच दाखवून दिली.
तिनं आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीनं आपला सह-अभिनेता अक्षय डोगराची विकेटही घेतली.
यानंतर बोलताना आरती म्हणाली की, 'मालिकेत अंबा ही गंभीर भूमिका साकारल्यानंतर क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी फारच आरामदायी वाटतं. मी अक्षयची विकेटही घेतली. त्यामुळे हे फारच मजेशीर होतं. मी विकेट घेतल्यानं अक्षयनं खेळाची मजा घेतली असेल असं अजिबात वाटत नाही.' वारिस ही मालिका अॅण्ड टिव्हीवर प्रसारित होते.