मुंबई : मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री मयुरी वाघ (Mayuri Wagh) आणि अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade) यांचे लग्न आणि त्यानंतर झालेला घटस्फोट हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘अस्मिता’ मालिकेच्या सेटवर सुरू झालेली त्यांची मैत्री लवकरच प्रेमात बदलली, मात्र हे नातं फक्त दोन वर्षांच टिकलं. अनेक वर्षांनंतर मयुरीने (Mayuri Wagh) पहिल्यांदाच त्या काळातील भावनिक संघर्ष आणि वेदना उघडपणे व्यक्त केल्या आहेत. सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब कार्यक्रमात मयुरीने स्पष्टपणे सांगितले, “आज मला काहीच गोष्टींचा पश्चात्ताप नाही, पण लग्नाचा निर्णय थोडा घाईत घेतला, असं आता जाणवतं. आजच्या मुली लग्नाआधी जोडीदाराबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल आणि आर्थिक स्थैर्याबद्दल विचार करतात, पण मी तसं काही केलं नाही. तो एक प्रवाह होता, आणि त्यातच मी वाहत गेले.” तिने पुढे सांगितले, “आई-वडिलांनी माझा निर्णय मान्य केला, पण कदाचित त्यांच्या मनात शंका होती,” असंही ती म्हणाली.(Mayuri Wagh) 

Continues below advertisement

Mayuri Wagh: ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला, ती व्यक्ती...

मयुरी पुढे म्हणाली की, सहा महिन्यांत तिला जाणवलं होतं की, तिचा लग्नाचा निर्णय चुकला आहे. पण, तिला ते स्वीकारायला खूप वेळ लागला. माझ्या आई-बाबांना ४ महिन्यांत समजले होते की, हे सगळं चुकलंय. पण, ही गोष्ट मला समजायला जवळजवळ दीड वर्षे लागली, ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला, ती व्यक्ती हे करू शकत नाही, हे समजायला मला खूप वेळ लागला. या कठीण काळात 'ती फुलराणी' नाटकाचे शूटिंग सुरू होतं, सेटवरच्या सहकलाकारांनाही तिच्या आयुष्यात काहीतरी गडबड सुरू असल्याचे जाणवत होतं असंही तिने यावेळी बोलताना सांगितलं. मयुरी पुढे म्हणाली, "मी खूप डिस्टर्ब असायचे. सीन संपला की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे, हे त्यांना दिसायचं. अनेकदा पहाटे दोन-तीन ते चार वाजेपर्यंत ते सगळे माझ्यासाठी थांबायचे, कारण तेव्हा मला झोप लागायची नाही."

Mayuri Wagh: मी घरात मासे आणून ठेवले होते आणि त्यांच्याशी बोलायची

मुलाखतीवेळी मयुरीला पियुषसोबतच्या लग्नामध्ये शारीरिक छळ झाला का? या प्रश्नावर, तिने 'हो' असे उत्तर दिले. कोरोना काळात ती एकटी राहायची, तेव्हा तिच्या आईला तिची खूप काळजी वाटायची. ह्या सगळ्या विचारातून बाहेर पडायला मला सहा महिने लागले. मी घरात मासे आणून ठेवले होते आणि त्यांच्याशी बोलायची, कारण मी आई-वडिलांना काही सांगू शकत नव्हते, असंही ती म्हणाली, "जेव्हा मला रिअॅलिटी चेक मिळाला, तेव्हा मी ठरवलं आता कुणावर विश्वास ठेवायचा नाही असं तिने ठरवलं आणि निर्णय घेतला, असंही तिने सांगितलं."

Continues below advertisement

Mayuri Wagh: कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये

'मला आता कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये. पण, मी लग्नाचा निर्णय खूप लवकर घेतला असं मला वाटतं. कारण, मी आताची पिढी पाहते, लोक खूप विचार करून लग्न करतात. हे मी केलं नाही…पण, आताच्या मुली फार सॉर्टेड आहेत. एक एक्स अमाऊंट पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं घर असायला पाहिजे, कुटुंबात या गोष्टी पाहिजेत हे अलीकडच्या काळात लग्न करताना पाहिलं जातं. पण, माझ्या बाबतीत असं झालं नाही. तो एक प्रवाह होता आणि त्यातच मी लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनी सुद्धा या निर्णयात माझी साथ दिली. त्यांना त्यावेळी कदाचित हे सगळं पटलं नसेल. पण, तरीही त्यांनी पाठिंबा दिला. सहा महिन्यांतच जाणवलं होतं आपला लग्नाचा निर्णय चुकला पण, मला ते कळायला आणि स्वीकारायला खूप वेळ लागला.' असंही मयुरीने पुढे सांगितलं.

Mayuri Wagh: मी त्याला सरप्राइज द्यायला गेले होते,पण...

तिने एक तीचा अनुभवही सांगितला. ती म्हणाली, मालिका सुरू असताना मी त्याला सरप्राइज द्यायला गेले होते. पण तो मालिकेच्या सेटवरच नव्हता. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. तेव्हाही मी तसं असेलही, असं मनाला समजवलं.

Mayuri Wagh: काही गोष्टी कानावर आल्या होत्या

ती म्हणाली, काही गोष्टी कानावर आल्या होत्या. तेव्हा मी पूर्णपणे प्रेमात होते. आपल्या माणसावर विश्वास ठेवला. एक चान्स दिला. पण जेव्हा गोष्ट माझ्या आई-वडिलांवर आले तेव्हा मात्र निर्णय घेतला. समोरचा व्यक्ती मला बोलत होता, तो पर्यंत ठीक होतं, पण जेव्हा माझ्या वडिलांना बोलला तेव्हा मी ठरवलं की, आता बस्स...त्यानंतर आई-वडील नेहमीच सोबत होते, असंही तिनं सांगितलं.