Masterchef India : भारताचा सर्वात लाडका कुकिंग रिअॅलिटी शो ‘मास्टरशेफ इंडिया’ (Masterchef India) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा हा शो स्टार वाहिनीवर नाही तर, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्ह याठिकाणी पाहता येणार आहे. नव्या आणि उत्साही स्पर्धकांच्या पाककौशल्याद्वारे हा शो प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे. मास्टरशेफमधून लवकरच भारताचा नवा मास्टरशेफ शोधण्याची मोहीम सुरू होणार असून, त्यासाठीच्या ऑडिशन्सची सुरुवात कोलकाता येथून होणार आहे व त्यानंतर मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली इथे या प्रवेश फेऱ्या पार पडणार आहेत.


तुमच्या ध्यानी, मनी, स्वप्नी फक्त आणि फक्त खाद्यपदार्थांची पंगत असेल आणि तुमचे आयुष्य पाककृतींच्या अवतीभोवती फिरत असेल, तुम्ही देखील या नव्या सीझनमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला देखील ‘मास्टर शेफ’च्या या नव्या सीझनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर, 24 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑडिशन्समध्ये सामील व्हावे लागणार आहे.



कुठे आणि कधी पार पडणार प्रवेश प्रक्रिया? 


* कोलकात्यामधील ऑडिशन्स 24 सप्टेंबर रोजी, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पी-16, तारातला रोड, सीपीटी कॉलनी, अलीपोर, कोलकाता, पश्चिम बंगाल 700088 येथे पार प़डणार आहेत.


* दिल्‍ली ऑडिशन्‍स 1 ऑक्‍टोबर रोजी हॅप्‍पी मॉडेल स्‍कूल, बी2, जनकपुरी, नवी दिल्‍ली 110058 येथे घेण्‍यात येतील.


* मुंबईतील ऑडिशन्स 15 ऑक्टोबर रोजी रायन इंटरनॅशनल स्कूल, वास्तू पार्क, ऑफ लिंकिंग रोड, मालाड, एव्हरशाईन नगर, मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400064 येथे होणार आहेत. 


* हैदराबादमधील ऑडिशन्स 6 ऑक्टोबर रोजी सेंट. अॅन्स कॉलेज फॉर विमेन, ए/75,  सेंट अॅन्स रोड, संतोष नगर, मेहदीपटनम, हैदराबाद, तेलंगणा 500028 येथे पार पडणार आहेत. 


विविध शहरांतील ऑडिशन्स पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष शोमध्ये देशभरातील शेफ्स स्पर्धेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.


नव्या सीझनसाठी किचन सज्ज!


‘मास्टरशेफ’चे किचन पुन्हा एकदा खमंग पदार्थांसाठी सज्ज झाले आहे. आता परीक्षक मंडळी देखील उत्साहाने भारलेल्या, मनातील उर्मीला साद देणाऱ्या, प्रतिभाशाली पाककुशल जाणकार मंडळींना मास्टरशेफ इंडियाच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. जर तुम्हालाही या नव्या सीझनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर, या स्पर्धेसाठी आपली नावनोंदणी करायला आणि ऑडिशन्स द्यायला विसरू नका.


हेही वाचा :


National Cinema Day 2022: राष्ट्रीय चित्रपट दिनी 75 रुपयांमध्ये चित्रपट बघायचाय? असं बुक करा तिकीट


Hariom Movie :  'हरिओम' मधील 'सुरु झाले पर्व नवे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज