Nupur Joshi : मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींना त्यांच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग आहे. केवळ चाहत्यांच्या संपर्कात राहणेच नाही तर, सोशल प्लॅटफॉर्म हे अनेक कलाकारांसाठी कमाईचे साधन देखील आहेत. कलाकार त्यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टमधून लाखो रुपये कमावतात. या सगळ्यांच्या दृष्टीने फॉलोअर्स आणि ब्लू टिकसारख्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण, सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. अशाच एका प्रकरणात 'ये रिश्ता क्या कहलाता है' या हिट टीव्ही शोची अभिनेत्री नुपूर जोशी (Nupur Joshi) सायबर फ्रॉडची शिकार झाली आहे.


टीव्ही अभिनेत्री नुपूर जोशी संपूर्ण घटना इंस्टाग्रामवर शेअर करून, याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमधून ती तिची वैयक्तिक कागदपत्रे आणि माहितीबद्दल खूपच चिंतीत दिसत आहे. नुपूर जोशीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आणि सांगितले की, तिने चुकून तिचा अधिकृत आयडी पुरावे एक फ्रॉड ईमेलवर शेअर केले आहेत आणि आता भविष्यात या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची भीती तिला वाटत आहे.


पोस्ट लिहित म्हणाली...


नुपूर आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, 'मला आशा आहे की, आपण सगळे निरोगी आणि सुरक्षित आहात. नुकतीच मी इंस्टाग्रामवर एक रिक्वेस्ट सबमिट केली, जी माझ्या आणि त्यांच्या दरम्यान गोपनीय असायला हवी होती. पण, दुर्दैवाने, इन्स्टाग्रामच्या टीमऐवजी माझी ही रिक्वेस्ट हॅकर्सच्या टीमकडे गेली. या रिक्वेस्टबाबत त्यांनी मला ई-मेल पाठवला. ज्यात त्यांनी मला माझ्या ओळखपत्रांच्या पुराव्याची माहिती विचारली. मला फसवलं गेलं आहे आणि आता मी घाबरले आहे. मला माहित नाही की, ते माझ्या या माहितीचा भविष्यात कसा वापर करू शकतात.’  


 






ब्लू बॅज मिळवण्याच्या नादात...


या पोस्टमध्ये नुपूरने म्हटले की, तिने तिचे अकाऊंट व्हेरीफाय करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती, ज्यामध्ये अकाऊंटला ब्ल्यू टिक मिळते. याबद्दल बोलताना नुपूर म्हणाली, 'मी गेल्या एक दशकापासून मनोरंजन विश्वात काम करत आहे, जोपर्यंत माझ्या चाहत्यांनी आणि मित्रांनी मला त्याची गरज सांगितली न्हाई, तोपर्यंत मला ब्लू बॅजमध्ये कधीच रस नव्हता. पण आता ब्लू टिक मिळवण्याच्या नादात माझी फसवणूक झाली आहे आणि मी ऑनलाईन फ्रॉडची बळी ठरले आहे.’


कोण आहे नुपूर जोशी?


‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोमध्ये अभिनेत्री नुपूर जोशी अभिनेता मोहसिन खानच्या आईच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय नुपूर जोशी 'राखी' आणि 'दो हंसों का जोडी' सारख्या टीव्ही शोमध्ये झळकली आहे.


हेही वाचा :


National Cinema Day 2022: राष्ट्रीय चित्रपट दिनी 75 रुपयांमध्ये चित्रपट बघायचाय? असं बुक करा तिकीट


Hariom Movie :  'हरिओम' मधील 'सुरु झाले पर्व नवे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज