Marathi Serial Updates Shreya Bugde :  'चला हवा येऊ द्या'  (Chala Hawa Yeu Dya) हा कॉमेडी शो बंद झाल्यानंतर आता त्यातील कलाकार आता पुन्हा नव्याने कमबॅक करत आहेत. काही  कलाकारांनी 'झी मराठी'ची साथ सोडत दुसऱ्या चॅनेलवरील मालिका, शोमध्ये काम करण्यास  सुरुवात केली आहे. भारत गणेशपुरे यांनी 'झी मराठी'वरील 'शिवा' मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता श्रेया बुगडेही (Shreya Bugde) कमबॅक करत आहे. चला हवा येऊ द्यानंतर श्रेया बुगडे काय करणार, याची चर्चा सुरू होती. आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. श्रेया बुगडे आता 'झी मराठी'वरच (Zee Marathi)  कमबॅक करत आहे. नव्या भूमिकेत श्रेया दिसणार आहे. त्याशिवाय, अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) नव्या भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

छोट्या पडद्यावर टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. अधिकाधिक प्रेक्षकांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी नव्या मालिका, शो सुरू करण्यात येत आहे. तर, सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात नवा ट्विस्ट येत आहे. झी मराठी वाहिनीवर आता नवा रिएल्टी शो सुरू होणार आहे.  'ड्रामा ज्युनियर्स' या नव्या रिएल्टी शोच्या माध्यमातून श्रेया बुगडे कमबॅक करत आहे. श्रेया या शोची होस्ट असणार आहे. त्यामुळे श्रेयाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

चला हवा येऊ द्या शो डॉ. निलेश साबळेने सोडल्यानंतर शेवटच्या काही एपिसोडचे सूत्रसंचालन श्रेयाने केले होते. त्यानंतर आता ती 'ड्रामा ज्युनियर्स' या लहान मुलांसाठी असलेल्या रिएल्टी शोमध्ये दिसणार आहे. 

अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे नव्या भूमिकेत

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नव्या भूमिकेत दिसणार आहेत. 'ड्रामा ज्युनियर्स' या लहान मुलांसाठी असलेल्या रिएल्टी शोमध्ये ते परीक्षकांच्या भूमिकेत असणार आहे. संकर्षण एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्याला त्याचवेळी एका वाहनात टाकून नेण्यात आलं. तर दुसरीकडे अमृताला आपल्या व्हॅनिटी मधून बाहेर पडताच तिचे चाहते आणि बॉडीगार्डच्या उपस्थितीत किडनॅप केल्याचा प्रोमो काही दिवसांपूर्वी झी मराठीवर दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रोमो मागील सत्य उलगडले आहे. अमृता आणि संकर्षण हे परीक्षक म्हणून या 'ड्रामा ज्युनियर्स'मध्ये दिसणार आहेत.