Marathi Serial Updates Drama Juniors Zee Marathi : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी मराठी वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिका येत आहेत. या नवीन मालिकांसाठी जुन्या मालिकांच्या वेळा बदलण्यात येत आहे अथवा त्यांना निरोप दिला जात आहे. झी मराठीवर (Zee Marathi) आता 'ड्रामा ज्युनियर्स'  (Drama Juniors) हा नवा रिएल्टी शो येत आहे. लहान मुलांचा अभिनय कौशल्य पाहणारा हा रिएल्टी शो आता 22 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'ड्रामा ज्युनियर्स'साठी कोणत्या मालिकेची वेळ बदलण्यात येणार याची चर्चा सुरू झाली आहे. 


छोट्या पडद्यावर टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. अधिकाधिक प्रेक्षकांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी नव्या मालिका, शो सुरू करण्यात येत आहे. तर, सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात नवा ट्विस्ट येत आहे. या सगळ्यात 'ड्रामा ज्युनियर्स' हा नवा शो येत आहे. 'ड्रामा ज्युनियर्स'हा शो 22 जूनपासून शनिवार-रविवारी रात्री 9 वाजता प्रसारीत होणार  आहे.  






कोणत्या मालिकेवर होणार परिणाम?


झी मराठीवर सध्या रात्री 9 वाजता शिवा ही मालिका ऑनएअर जाते. शिवा मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आशू आणि शिवाचा विवाह होणार आहे. मात्र, आशू हे लग्न  वडिलांच्या इच्छेसाठी करतो. तर, दुसरीकडे  सीताईदेखील रामभाऊंच्या निर्णयावर नाराज असते. सीताई शिवाला सून मानण्यास नकार देत तिच्या गृहप्रवेशाला मनाई करते. शिवामध्ये आता नवीन वळण येत असताना आता 'ड्रामा ज्युनियर्स' 9 वाजता ऑनएअर जाणार असल्याने मालिकेचे काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. 






झी मराठी मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  'ड्रामा ज्युनियर्स'मुळे कोणत्याही मालिकांच्या वेळा बदलल्या जाणार नाहीत. 'शिवा' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता प्रसारीत होते. आता 'ड्रामा ज्युनियर्स'मुळे शिवा ही मालिका सोमवार ते शुक्रवार दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'ड्रामा ज्युनियर्स'  या नव्या रिएल्टी शोच्या माध्यमातून श्रेया बुगडे कमबॅक करत आहे. श्रेया या शोची होस्ट असणार आहे. त्यामुळे श्रेयाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तर, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.