Marathi Serial Updates  Abir Gulal Serial :  'तुला पाहते रे'  (Tula Pahate Re) ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. सुबोध भावे, अभिज्ञा भावे, गायत्री दातार, शिल्पा तुळसकर, आशुतोष गोखले, सोनल पवार, गार्गी फुले, संदेश जाधव आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी गायत्री दातार (Gayatri Datar) आता मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. गायत्री दातार आता कलर्स मराठीच्या 'अबीर गुलाल' (Abir Gulal Serial) मालिकेत दिसणार आहे. टीआरपीच्या शर्यतीत काहीसा मागे पडलेली  कलर्स मराठी वाहिनी पुन्हा एकदा आपले स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  मागील काही दिवसांमध्ये कलर्स मराठीवर नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. तर, आता नव्या मालिका येणार आहेत. काही दिवसांपूर्वी 'अबीर गुलाल' मालिकेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज कलर्स मराठीकडून मालिकेचा दुसरा प्रोमो लाँच करण्यात आला. 

Continues below advertisement

‘अबीर गुलाल’ या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये रुग्णालयात दोन बाळांची अदलाबदल होताना दिसली. या मालिकेचा आता दुसरा प्रोमो लाँच करण्यात आला.

'अबीर गुलाल'च्या दुसऱ्या प्रोमोमध्ये काय?

अबीर गुलाल मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये मालिकेतील प्रमुख पात्रांची ओळख करून देण्यात आली. गायत्री दातार या मालिकेत शुभ्रा ही व्यक्तीरेखा साकारत आहे. शुभ्रा ही श्रीमंत कुटुंबातील असून काळा रंग हा तिचा नावडता रंग आहे. तर,  अभिनेत्री पायल जाधव ही श्री ही व्यक्तीरेखा साकारत आहे. ती दिसायला कृष्णवर्णीय असल्याने तिच्या वडिलांचा तिच्यावर राग असतो. तर, आपल्या शरीराच्या रंगाकडे ती सकारात्मकपणे पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. 

Continues below advertisement

 

पायल जाधवचे मालिका विश्वात पदार्पण

अभिनेत्री पायल जाधव ही या टीव्ही मालिका विश्वात 'अबीर गुलाल' मालिकेच्या निमित्ताने पदार्पण करत आहे. पायल जाधवची ही पहिलीच मालिका असून याआधी ती ‘बापल्योक’ या चित्रपटात झळकली होती. तिच्या कामाचे कौतुक झाले होते.  तर, गायत्री दातार ही टीव्ही मालिकेत या कमबॅक करत आहे. त्यामुळे गायत्रीच्या भूमिकेकडे आता तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

इतर संबंधित बातमी :