Sukh Mhanje Nakki Kay Asta: छोट्या पडद्यावरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत जयदीप-गौरीची भेट तर झाली आहे पण ज्या शालिनीमुळे जयदीप-गौरीला एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं तिला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. शालिनीला तिच्या पापांचं प्रायश्चित देण्यासाठी जयदीप वेष पालटून शिर्के पाटलांच्या घरात दाखल होणार आहे. यासाठी जयदीपने एका वृद्धाचा लूक केला असून तो लक्ष्मी इंडस्ट्रीजचा मालक म्हणजेच जयवंत देशमुख असल्याचं भासवणार आहे.
खरतर शालिनीने चिमुकल्या लक्ष्मीला जीवे मारण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला. लेकीच्या प्रेमापोटी जयदीपला शिर्के पाटलांच्या घरापासून दूर राहावं लागलं. गौरीपासूनही तो दुरावला. मात्र आता जयदीप गौरी एकत्र आले आहेत. आपल्या अनुपस्थितीत शालिनीने गौरीला दिलेल्या त्रासाचा बदला जयदीपला घ्यायचा आहे. यासाठीच त्याने नवं रुप धारण केलं आहे.
शालिनी पैशांची लोभी आहे हे सर्वांनाच ठावूक आहे. लक्ष्मी इंडस्ट्रीजचा मालक घरी आलाय म्हणल्यावर त्याच्या पैशांवर देखील शालिनीचा डोळा आहे. पैसे मिळवण्यासाठी ती काहीही करु शकते. त्यामुळे जयवंत देशमुख हा नवा अवतार धारण केलेल्या जयदीपच्या तालावर शालिनी कशी नाचणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. मालिकेच्या कथानक देखील प्रेक्षकांची मनं जिंकते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
तुझेच मी गीत गात आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर रितेश-जेनिलियानं लावली हजेरी