Marathi Serial: नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधी अनेक जण नवीन वर्षाचे संकल्प (New Year 2024) करतात. हे संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील लोक करतात. तुमच्या आवडत्या कलाकारांनीही 2024 या वर्षासाठी काही संकल्प केले आहेत. मराठी मालिकांमधील कलकारांनी केलेले नवं वर्षाचे संकल्प जाणून घेऊयात...
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील नेत्रा म्हणजे तितीक्षा तावडेनी सांगितले, "मी 2024 या वर्षासाठी हा संकल्प केले आहे की,चित्रकला, नवीन अनोळखी आणि वेगळी ठिकाणे शोधून त्या जागा फिरणे अशा छोट्या- छोट्या गोष्टी ज्या मला आनंद देतात त्या गोष्टींना मी वेळ देणार आहे. मी माझ्या युट्यूब चॅनल ग्रो कारेन कारण मला माझ्या चॅनेलसाठी व्हिडीओ बनवताना खूप मज्जा येते. नवीन गोष्टी वाचून आणि बघून अभिनय कौशल्यामध्ये सुधारणा करणार. बारीक होण्यावर ताण न ठेवता त्याऐवजी सातत्यपूर्ण व्यायाम करून, मी 2024 मध्ये योग्य आहार घेऊन तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
सर्वांची लाडकी अक्षरा म्हणजेच 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधील शिवानी रांगोळेने 2024 या नवीन वर्षासाठी संकल्प करताना सांगितले की, "मी नवीन वर्षामध्ये ध्यान रोज करेन. तो माझ्या रोजच्या दिनचर्येचा भाग नक्की असेल आणि कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करणार कारण त्यांच्यासोबत वेळ घालवणे माझ्यासाठी खूप आनंददायी ठरते. शूटिंगच्या गडबडीत ह्या दोन गोष्टींवर 2023 मध्ये खूप दुर्लक्ष झाले आहे. पण आता नाही मी जस ठरवलं आहे तसाच करणारा.
'अप्पी आमची कलेक्टरचा' अर्जुन म्हणजे रोहित परशुरामने 2024 च्या संकल्पा मध्ये सांगितले, 'आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं हे तर आहेच पण एक गुप्त संकल्प आहे जे सध्या फक्त मलाच माहिती आहे. काही महिन्यातच ते संकल्प पूर्ण होईल आणि महाराष्ट्रसमोर माझं ते गुपित प्रेक्षकांच्या समोर येईल. 2024 मध्ये उत्तम काम आणि आरोग्याची काळजी घेईन.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' इंद्राणी म्हणजे श्वेता मेहेंदळेने सांगितले' "दरवर्षी मी एक संकल्प करते कि आठवड्यला एक पुस्तक म्हणजेच वर्षाला 52 पुस्तकं वाचून झालीच पाहिजे. हा संकल्प मी अनेक वर्षपासून ठरवत आहे पण अजूनपर्यंत तो पूर्ण झालेला नाही म्हणून 2024 मध्ये 52 पुस्तकं वाचून पूर्ण करायचा संकल्प मी पूर्ण करणार आहे. दुसरा संकल्प आहे की 2023 मध्ये कोकण आणि गोवा अशा राइड्स केल्या होत्या तर आता 2024 मध्ये लांबची राइड कराची आहे फक्त 'सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या' शूटिंग मधून वेळ कसा काढायचा ह्याच नियोजन मला करायचं आहे. तर हे दोन मोठे संकल्प आहेत 2024 मध्ये."
'सारं काही तिच्यासाठी' मधली निशिगंधा खोत म्हणजे दक्षता जोइलनी सांगितले, "शूटिंग मध्ये व्यस्त असताना खूप छान चित्रपट आणि वेब सिरिज बघणं राहून जातात. दुसऱ्या कलाकारांचे छान काम बघून खूप शिकायला ही मिळत आणि मला चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला ही आवडत. तर मी निशचय करीन स्वतःशी कि 2024 मध्ये जितके जास्त सिनेमे पाहायला मिळतील तितके अगदी वेळ काढून बघीन."
2024 मध्ये तुम्हीही उत्तम संकल्प करा आणि एक संकल्प हाही करा कि जे संकल्प केले आहेत ते यथार्थपणे पूर्ण करा. नवीन वर्षाचे त प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा!
संबंधित बातम्या: