Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या पर्वात आता स्नेहलता वसईकरची (Snehlata Vasaikar) पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. तर या घरामधून योगेश जाधव (Yogesh Jadhav) बाहेर पडला आहे. 


विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये होते. ज्यामधून योगेशला घर सोडावं लागलं. तर दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या पर्वातली पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. स्नेहलता वसईकरच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील?  नात्यांमध्ये काय बदल होतील? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल? कोण होईल घराचा नवा कॅप्टन? म्हणजेच येणारा आठवडा खूप आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.


बिग बॉस मराठीच्या चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी किरण मानेची चांगलीच कानउघडणी केली आहे. चावडीवर त्यांनी बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली. कोण कुठे चुकले, कोण बरोबर खेळले सगळ्याचा हिशोब घेतला. सदस्यांच्या वर्तणुकीसाठी त्यांनी स्पर्धकांना चांगलंच सुनावले. 






स्नेहलता वसईकरने अनेक मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या ऐतिहासिक मालिकेत स्नेहलता सोयरा बाईसाहेबांच्या भूमिकेत दिसून आली होती. या मालिकेमुळे स्नेहलता घराघरांत पोहोचली. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. स्नेहलता वसईकर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत असते. बोल्ड फोटोशूटमुळे नेटकरी तिला अनेकदा ट्रोल करत असतात. 


'बिग बॉस मराठीच्या' चौथ्या पर्वात 16 स्पर्धक सहभागी झाले होते. यातून निखिल राजेशिर्के आणि मेघा घाटगेला घराबाहेर जावे लागले होते. आता योगेश जाधवदेखील घराबाहेर पडला आहे. पण स्नेहलता वसईकरच्या एन्ट्रीने घरातील वातावरण आनंदमय झाले आहे. स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीचा खेळ कसा खेळणार याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या


Big Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' च्या घरात होणार पहिली Wild Card Entry; 'या' स्पर्धकाला तुम्ही ओळखलंत का?