Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

Continues below advertisement

1. टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. 

2. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.

Continues below advertisement

3. टीआरपी लिस्टमध्ये 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे. 

4. 'आई कुठे काय करते' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे.

5. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.6 रेटिंग मिळाले आहे.

6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.  

7. टीआरपीच्या शर्यतीत 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे. 

8. 'स्वाभीमान' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.2 रेटिंग मिळाले आहे. 

9. नव्या स्थानावर 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका आहे. या मालिकेला 4.2 रेटिंग मिळाले आहे. 

10. 'मन उडू उडू झालं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.1 रेटिंग मिळाले आहे. 

'रंग माझा वेगळा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आहे. तर 'मन उडू उडू झालं' मालिकेत सतत नवा ट्विस्ट येत असल्याने ही मालिका पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आली आहे. पण आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

संबंधित बातम्या 

Marathi Serial : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' टीआरपीच्या शर्यतीत सलग दुसऱ्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट

Aai Kuthe Kay Karte : 'मी त्यांना दबंग म्हणतो'; आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांची खास पोस्ट