Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Jawan: शाहरुखचा 'जवान' सिनेमा पाहिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्यानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'डोक्यावर घेऊन वरात काढायला हवी...'


Jawan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)  जवान (Jawan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अनेकजणांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन जवान या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. नुकतीच एक मराठमोळ्या अभिनेत्यानं जवान या चित्रपटाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या अभिनेत्यानं या पोस्टच्या माध्यमातून जवान चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Mitali Mayekar: 'शंभर समस्या...'; मितालीनं शेअर केला खास व्हिडीओ, सिद्धार्थनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष


Mitali Mayekar: अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. मिताली मयेकरनं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मितालीनं शेअर केलेल्या व्हिडीओवर  सिद्धार्थ चांदेकरनं (Siddharth Chandekar) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Jawan: टक्कल अन् डोळ्यावर गॉगल; शाहरुखसारखा हुबेहूब लूक करुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकारानं केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल


Jawan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील शाहरुखच्या विविध लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  फेम कलाकार पृथ्वीक प्रतापनं (Prithvik Pratap) नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पृथ्वीकनं शाहरुखच्या जवान या चित्रपटामधील लूकसारखा हुबेहूब लूक केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Manoj Jarange: मनोज जरांगेंचा संघर्ष रुपेरी पडद्यावर, चित्रपटात कोण साकारणार भूमिका?


Manoj Jarange:  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे (Jalna Maratha Reservation Protest)  यांच्यावर आधारित असणारा चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मनोज जरांगे यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार का?  या चित्रपटात कोण प्रमुख भूमिका साकारणार? असे प्रश्न अनेकांना पडले होते. आता याबाबत मनोज जरांगे यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Asha Bhosle: आशा भोसले यांचा 90 वा वाढदिवस; पहिल्या गाण्याचा किस्सा ते कुकिंगची आवड, जाणून घ्या 'मेलोडी क्वीन'बाबत ...


Asha Bhosle: हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचा आज 90 वा  वाढदिवस आहे. आशा भोसले यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत.  'मेलोडी क्वीन'  असंही म्हटलं जातं.  विविध जॉनर्सची गाणी आशाताईंनी गायली. आज आशाताईंच्या  90 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा