Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवधूत गुप्ते पोस्ट शेअर करत म्हणाला, 'या पर्वाचा शेवटचा भाग...'


Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक  नेते मंडळी तसेच काही कलाकारांनी हजेरी लावली. आता या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रविवारी (17 सप्टेंबर) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत  अवधूत गुप्तेनं (Avadhoot Gupte)  एक खास पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sonalee Kulkarni : अप्सराला बाप्पा कसा पावला? सोनाली कुलकर्णी रमली गणेशोत्सवाच्या आठवणीत


Sonalee Kulkarni On Kalavantancha Ganesh : केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सोनाली कुलकर्णीचं (Sonalee Kulkarni) आणि बाप्पाचं (Ganeshotsav 2023) खास नातं आहे.  मुळात अभिनेत्रीच्या करिअरची सुरुवातच गणेशोत्सवापासून झालेली आहे. कलेचं दैवत असणारा बाप्पा सोनाली कुलकर्णीसाठी लकी ठरला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Hemangi Kavi : 'बाई, बुब्स आणि ब्रा'नंतर येणारी हेमांगी कवीची प्रत्येक पोस्ट ट्रोल; ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...


Hamangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी 'बाई, बुब्स आणि ब्रा...' ही हेमांगीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली. त्यानंतर काहींनी अभिनेत्रीला ट्रोल केलं तर काहींनी मात्र तिच्या या पोस्टचं कौतुक केलं. पण या पोस्टरनंतर येणारी हेमांगी कवीची प्रत्येक पोस्ट ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरू लागली आणि ट्रोलर्स मंडळी ट्रोल करू लागले. पण अभिनेत्री मात्र या ट्रोलर्स मंडळींकडे दुर्लक्ष करत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kishor Kadam: 'आपण बोलून निघून जायचं, होईल जनतेचं जे व्हायचं...'; कवी सौमित्र यांच्या कवितेनं वेधलं अनेकांचे लक्ष


Kishor Kadam: कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम (Kishor Kadam) हे कवितांच्या माध्यमातून विविध विषयांवरील भाष्य करतात. किशोर कदम हे चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. नुकतीच किशोर कदम यांनी फेसबुकवर त्यांनी लिहिलेली एक कविता शेअर केली आहे. त्यांच्या या कवितेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Nana Patekar : देशाच्या विरोधात बोलणारी मंडळी खूप आहेत; नाना पाटेकरांनी नेत्यांना फटकारलं


Nana Patekar : रुपेरी पडद्यावर झळकणारे सेलिब्रिटी असो किंवा क्रिकेटचं मैदान गाजवणारा प्लेस्टार असो. आपल्याकडे असणारी हिरोची संकल्पना थोडी बदलण्याची गरज आहे. तर खऱ्या रिअल हिरोपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. असाच एक खरा हिरो नाना पाटेकर (Nana Patekar) त्यांच्या आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. दरम्यान देशाच्या विरोधात बोलणारी मंडळी खूप आहेत, असं म्हणत नाना पाटेकरांनी नेत्यांना फटकारलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा