Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Ravrambha : 'रावरंभा'...मावळ्याच्या प्रेमाची आणि शौर्याची गाथा; राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा आज घरबसल्या पाहा


Ravrambha Marathi Movie : 'रावरंभा' (Ravrambha) हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला. आता हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 'रावरंभा' या सिनेमात प्रेक्षकांना राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kishori Shahane : नाचणीची भाकरी, सुरमई फ्राय.. अभिनेत्री किशोरी शहाणेंनी चुलीवर बनवलं जेवण; पाहा व्हिडीओ


Kishori Shahane : मराठमोळी अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) सध्या चर्चेत आहेत. पण सध्या त्या कोणत्या कलाकृतीमुळे चर्चेत आलेल्या नसून त्यांच्या एका कृतीने चर्चेत आल्या आहेत. किशोरी शहाणे यांनी जेवण बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Prasad Oak : लोकशाहीर 'पठ्ठे बापूराव' यांचं जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर येणार; अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक मुख्य भूमिकेत


Patthe Bapurao Marathi Movie : लोकशाहीर पठ्ठे बापूराव (Patthe Bapurao)  यांचं जीवनचरित्र आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर 'पठ्ठे बापूराव' या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे. या सिनेमात प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील प्रसाद ओकनेच सांभाळली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; अभिनेत्रीने सुरू केला स्वत:चा व्यवसाय


Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता अभिनेत्रीने नवी इनिंग सुरू केली आहे. प्रार्थनाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kharach Tich Kay Chukla : 'खरंच तिचं काय चुकलं?' मालिकेत रोशन विचारे दिसणार प्रमुख भूमिकेत


Kharach Tich Kay Chukla : 'खरंच तिचं काय चुकलं?' (Kharach Tich Kay Chukla) ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. रोशन विचारे (Roshan Vichare) या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा