Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हास्यसम्राट जॉनी लिव्हरची हजेरी; रंगणार विशेष भाग


Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. दर शनिवारी या कार्यक्रमाचा विशेष भाग पार पडत असतो. आता या कार्यक्रमाच्या विशेष भागात विनोदवीर जॉनी लिव्हर (Johnny Lever) आणि जेमी लिव्हर (Jamie Lever) हजेरी लावणार आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक





Marathi Serial: वादळवाट ते उंच माझा झोका; 'या' मराठी मालिकांचे टायटल साँग्स आजही आवडीने ऐकले जातात


Marathi Serial: मराठी मालिका लोक आवडीनं बघतात. या मालिकांचे कथानक आणि मालिकेतील कलाकारांचा या गोष्टी प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. मराठी मालिकांच्या आगामी एपिसोड्समध्ये काय होणार? याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. मराठी मालिकेचे टायटल साँग्स देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. जाणून घेऊयात मराठी मालिकांच्या टायटल साँग्सबद्दल...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते' पडली मागे; 'या' मालिकेने मारली बाजी


Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serials) विश्वात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...







Bhargavi Chirmule: गिरगावात गेलं बालपण, नृत्य आणि अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मनं; जाणून घ्या भार्गवी चिरमुलेबद्दल


Bhargavi Chirmule: अभिनेत्री  भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule) ही अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. भार्गवी ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करते. भार्गवीच्या बालपणाबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात भार्गवीच्या मालिका, चित्रपट आणि बालपणाबद्दल...





 

Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा'ची हवा; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय?



Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मग ते सिनेमागृह असो वा महिला मंडळ गॉसिप गँग. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासोबत बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाने सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या 14 दिवसांत 36.78 कोटींची कमाई केली आहे. तगडी स्टारकास्ट, जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर दिवसेंदिवस या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये (Box Office Collection) वाढ होत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा