Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या आजच्या विशेष भागात रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अमेय वाघ (Amey Wagh) हजेरी लावणार आहेत. या विशेष भागाचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रेणुका शहाणे आणि अमेय वाघ 'कोण होणार करोडपती'चा खेळ मुक्तांगण मित्र फाउंडेशनसाठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. अमेयने सचिन खेडेकर यांच्यासोबत 'मुरांबा' हा सिनेमा केला आहे. तर दुसरीकडे रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर (sachin khedekar) यांनी 'सैलाब' या हिंदी मालिकेत काम केलं आहे. त्यामुळे मुरांबा आणि सैलाबच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणी ताज्या होणार आहेत.
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर अमेय साजिरी आणि त्याची पहिली भेट ते लग्नापर्यंतचा प्रवास सांगताना दिसणार आहे. आशुतोष राणांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा रेणुका शहाणे चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत. दरम्यान मुक्तांगण मित्रसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ किती रक्कम जिंकतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
'कोण होणार करोडपती' टीआरपीच्या शर्यतीत पडलं मागे
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. या कार्यक्रमाला फक्त 0.7 रेटिंग मिळाले आहे. तर गेल्या आठवड्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या विशेष भागालाही 0.7 रेटिंग मिळाले आहे. गेल्या आठवड्याच्या विशेष भागात रंगभूमीचा हाऊसफुल सम्राट प्रशांत दामले (Prashant Damle) आणि उत्कृष्ट अभिनेत्री कविता लाड (Kavita Lad) यांनी हजेरी लावली होती. हा विशेष भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
'मनासारखं जगायचं असेल तर आता मागे नाही राहायचं', असं म्हणत 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात प्रशांत दामले, कविता लाड, महेश मांजरेकर, शिवाजी साटम, परेश रावल, विजय केंकरे आणि सचिन आणि श्रिया पिळगावकर यांनी हजेरी लावली आहे.
कोण होणार करोडपती
विशेष भाग : 8 जुलै
किती वाजता? रात्री 9 वाजता
कुठे पाहता येईल? सोनी मराठी