Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Milind Gawali: 'खालच्या पातळीला जाऊन...' नेटकऱ्याची कमेंट; 'आई कुठे काय करते' मालिकेतील मिलिंद गवळी यांनी दिला रिप्लाय


Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. मिलिंद हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. नेटकऱ्याच्या या कमेंटला मिलिंद यांनी रिप्लाय देखील दिला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Swanandi Tikekar: स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचं ठरलं! अभिनेत्रीनं शेअर केला खास फोटो


Swanandi Tikekar: अभिनेता उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar-Tikekar) यांची मुलगी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar)  आणि इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांनी त्यांच्या रिलेशनशिपची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे. स्वानंदी आणि आशिष या दोघांनीही एकमेकांसोबतचा फोटो शेअर करुन त्यांच्या नात्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा



Jui Gadkari: 'डोकं सुन्न झालंय,सगळे सुखरुप असुदेत...'; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट


Jui Gadkari:  रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर (Lrshalwadi Landslide) काल रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. दरडीखाली 30 ते 40 घरं दबली आहेत, असा अंदाज लावला जात आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इर्शाळवाडी  दुर्घटनेबाबत नुकतीच अभिनेत्री जुई गडकरीनं (Jui Gadkari) एक पोस्ट शेअर केली आहे. 'सगळे सुखरुप असुदेत' अशी प्रार्थना जुईनं या पोस्टच्या माध्यमातून केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ishita Dutta And Vatsal Sheth: इशिता-वत्सल झाले आई-बाबा; लग्नाच्या सहा वर्षानंतर अभिनेत्रीनं दिला मुलाला जन्म


Ishita Dutta And Vatsal Sheth: अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta) आणि अभिनेता वत्सल सेठ (Vatsal Sheth) यांच्या घरी एका पाहुण्याचे आगमन झाले आहे. इशितानं  बुधवारी (19 जुलै) एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून इशिता आणि  वत्सल यांना शुभेच्छा देत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Genelia Deshmukh: ऑनस्क्रीन किसिंग सीनबाबत जिनिलिया देशमुखनं मांडलं मत; म्हणाली, 'मी तसा सीन करताना...'


Genelia Deshmukh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ट्रायल पीरियड (Trial period) हा चित्रपट 21 जुलै रोजी रिलीज होणार आहे.  जिनिलिया सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीमध्ये जिनिलियाला ऑनस्क्रीन किसिंग सीनबाबत विचारण्यात आलं. यावेळी जिनिलियानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा