Swanandi Tikekar: अभिनेता उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar-Tikekar) यांची मुलगी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar)  आणि इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांनी त्यांच्या रिलेशनशिपची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे. स्वानंदी आणि आशिष या दोघांनीही एकमेकांसोबतचा फोटो शेअर करुन त्यांच्या नात्याची माहिती चाहत्यांना दिली आहे


स्वानंदी आणि आशिष यांनी एकमेकांसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'This is US!' असं कॅप्शन दिलं आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी लव्ह आणि 'आमचं ठरलंय'या हॅशटॅग्सचा वापर केला आहे. स्वानंदी आणि आशिष यांच्या या पोस्टला कमेंट्स करुन अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


 राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे, स्पृहा जोशी, सुकन्या मोने, रसिका सुनील,हर्षदा खानविलकर, सुयश टिळक आणि गौतमी देशपांडे या कलाकारांनी स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या फोटोला कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.






कोण आहे आशिष कुलकर्णी?


आशिष कुलकर्णी हा गायक आहे. आशिषला इंडियन आयडॉल 12 (Indian Idol 12) या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तो मूळचा पुण्याचा आहे. तो गीतकार देखील आहे. त्याचे स्वतःचे YouTube चॅनल आहे, जिथे तो स्वतःची गाणी अपलोड करतो. आता स्वानंदी आणि आशिष हे लग्न कधी करणार आहेत? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.


स्वानंदीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, असं माहेर नको गं बाई, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत तिनं साकारलेल्या मिनल या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच तिनं अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केलं आहे. तसेच स्वानंदीला गाण्याची देखील आवड आहे. सिंगिंग स्टार या कार्यक्रमाची स्वानंदी विजेती ठरली होती. स्वानंदी ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 162K फॉलोवर्स आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Swanandi Tikekar: कुटुंबियांपासून राहते वेगळी, पैसे कमावण्याची संधी सोडून संघर्ष करण्याचा घेतला निर्णय;वैयक्तिक आयुष्याबाबत भरभरुन बोलली स्वानंदी