मुंबईजवळच्या 'सगुणाबाग'मध्ये सखी आणि सुव्रत यांचा लग्नसोहळा पार पडला. जवळचे मित्र-नातेवाईक अशा मोजक्या 80 जणांच्या उपस्थितीत दोघांनी साताजन्माच्या सोबतीच्या आणाभाका घेतल्या. मुंबईत लवकरच दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार आहे.
सखीने इन्स्टाग्रामवर मेहंदी, बॅचलर-स्पिनटर्स पार्टी आणि लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या अनेक मित्र मंडळींनीही सोशल मीडियावर दोघांचे फोटो पोस्ट केले आहेत.
सगुणाबागेत देखणा सोहळा, सखी गोखले-सुव्रत जोशीच्या लग्नाचे फोटो
सखी ही प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची कन्या. 'दिल दोस्ती दुनियादारी' ही सखीची पहिलीच टीव्ही मालिका. मात्र त्यापूर्वी सखीने 'रंगरेझ' या हिंदी मालिकेत लहानशी भूमिका केली होती. त्याशिवाय तिने काही जाहिरातीही केल्या आहेत.
सखी आणि सुव्रतची जोडी 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे घराघरात पोहचली. त्यानंतर 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकात आणि 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकेतही ते दोघं एकत्र झळकली. इथेच दोघांच्या प्रेमाचा अंकुर फुलल्याचं म्हटलं जातं. सुव्रतने शिकारी, पार्टी, डोक्याला शॉट यासारख्या सिनेमातही भूमिका केल्या.