Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे मालिका आणि विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'सेक्सची भूक' ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो! त्या नादात मानूस एकदा का घसरला की भल्याभल्यांचं माकड होतं. एकवेळ 'बाटली'तनं माणूस सहज बाहेर पडेल, पण बाईच्या मोहाच्या 'पिंजर्यात' अडकला की, त्याच्या 'नशिबानं थट्टा मांडली'च म्हणून समजा. हे लक्षात घेऊनच आपल्या तुकोबारायांवर खार खाऊन असलेल्या विरोधकांनी त्याच्या बदनामीसाठी 'हनी ट्रॅप' लावला होता भावांनो. पण चारीत्र्यवान तुकोबारायानं त्या बाईला आदरानं दूर करत असा उपदेश केला की ती सुद्धा या विचारांनी भारावून गेली. अंतर्बाह्य बदलून गेली!'
'मंबाजी आणि त्याच्या टोळक्यानं एका वेश्येला पैशांचं आमिष दाखवून तुकोबारायाकडं पाठवलं होतं. तिनं त्यांच्या प्रवचनाला जाऊन, अनुयायी असल्याचं नाटक करून तुकाराम महाराजांना नादी लावायचं आणि या टोळीनं त्यांना रेडहँड पकडून त्यांची बदनामी करायची असं कारस्थान रचलं होतं. पण तुकोबारायाला एवढे लेचेपेचे होते व्हय? आवो, तुकोबा वरवरचे संत नव्हते. आतून बाहेरून अस्सल, शंभर नंबरी सोनं होतं ते.. भुलले नाही असल्या मोहाला.' असंही किरण यांनी किरण लिहिलं.
पोस्टमध्ये किरण माने यांनी तुकोबांचा एक अभंग लिहिला आहे. हा अभंग लिहून पुढे कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, तीसुद्धा एक बाई आहे, तिच्या शारिरीक इच्छा पूर्ण करून घ्यायचा तिला अधिकार आहे..त्या भावनेचा मान राखत, तिला सेक्सच हवा असेल तर बाहेर अनेक 'नर' आहेत, तिकडे तिनं जावं हे नम्रपणे सांगणं तर अफलातून आहे ! आपल्याला शब्दांचा,भाषेचा समर्पकपणे वापर शिकायचा असंल तर तुकारामांच्या अभंगांसारखं साधन नाय ! शेवटच्या ओळीत तुकोबारायांनी 'पुरूष' हा शब्द न वापरता 'नर' हा शब्द वापरलाय. इथं प्रतिभेची झलक दिसते. फक्त सेक्ससाठी एकत्र येतात ते 'नर-मादी'. 'पुरूष आणि स्त्री'मध्ये काहीतरी भावबंध निर्माण व्हावे लागतात ! माझ्या दोस्तांनो, अफाट-अचाट-अफलातून माणूस होता आपला तुकोबाराया... खराखुरा संत. अस्सल समाजसुधारक. प्रतिभावान कवी ! जोपर्यन्त या पृथ्वीतलावर 'माणूस' आहे तोपर्यंत ही गाथा तरणार आहे.. माणसाला हिताचा मार्ग दाखवत रहाणार आहे.'
मुलगी झाली हो, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये किरण माने यांनी काम केलं आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Kiran Mane: 'तिला वाटलं आपला नातू बिघडला !...'; किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष