Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या देशपांडे सर सानिका आणि कार्तिकच्या लग्नाची बोलणी करायला इंद्राच्या घरी गेले आहेत. लग्नाची बोलणी व्यवस्थित झाल्याने मालिकेच्या आगामी भागात इंद्रा-दीपू एकमेकांचे तोंड गोड करणार आहेत. 


'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात देशपांडे सर देशपांडे सर सानिका आणि कार्तिकच्या लग्नाची बोलणी करायला इंद्राच्या घरी गेले आहेत. दरम्यान इंद्राची आई म्हणते,"मला नाही वाटत सानिका आणि इंद्राचं लग्न जास्त काळ टिकेल". आणि ती तिथून निघून जाते. इंद्राच्या आईच्या बांगड्या सानिकाला मिळणार की दीपूला मिळणार याकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 





इंद्राच्या आईच्या बोलण्याने देशपांडे सर मात्र नाराज झाले आहेत. सानिका आणि कार्तिकने पळून जाऊन लग्न केल्याने इंद्रा आणि दीपूला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारतआहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.


संबंधित बातम्या


Ashok Kadam : तबला-ढोलकी वादक अशोक कदम यांचे निधन; 25 वर्षे केलं लता मंगेशकरांसोबत काम


Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे निधन; वयाच्या 82 व्या घेतला अखेरचा श्वास


Raigadala Jevha Jaag Yete : 'रायगडाला जेव्हा जाग येते’आता नव्या संचात; शुभारंभाचा प्रयोग रायगडावर