Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या मालिकेत आनंदी-आनंद पाहायला मिळत आहे. इंद्रा-दीपू नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. कार्तिक आणि सानिका सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. मालिका आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे मालिकेतील इंद्राने म्हणजेच अजिंक्यने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.


इंद्रा-दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळेच इंद्राने 'मन उडू उडू झालं' मालिकेदरम्यानचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"इंद्रा-दीपूच्या जोडीला प्रेम दिल्याबद्दल आभार. एक चांगला दिग्दर्शक, सपोर्ट करणारं चॅनल, चांगल्या संकल्पना आणि भूमिका, टॅलेंटेड को-अॅक्टर्स हे माझ्यासाठी 'मन उडू उडू झालं' आहे. 






'मन उडू उडू झालं' मालिकेचे शूटिंग संपले असून शूटिंग संपल्यानंतर मालिकेतील कलाकारांनी जंगी सेलिब्रेशन केलं. त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. 'मन उडू उडू झालं' या मालिकेचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


'मन उडू उडू झालं' घेणार प्रेक्षकांचा निरोप


'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : देशपांडे सरांनी कार्तिकला दिली सुधारण्याची संधी; बेबूने मागितली इंद्राची माफी


Man Udu Udu Zhala : इंद्रा-दीपूचे बॅंकेत दिमाखात स्वागत; सोनटक्केने दिला बेस्ट कपलचा पुरस्कार