Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) या मालिकेत सध्या नव-नवीन ट्विस्ट येत असून सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. देशपांडे सरांनी कार्तिकला आता सुधारण्याची संधी दिली आहे. तसेच कार्तिकनेदेखील इंद्राची माफी मागितली आहे.
कंपनीची जबाबदारी पुन्हा इंद्राकडे
इंद्रा-दीपूचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात कार्तिकने देशपांडे सरांच्या घरी चोरी केली. कार्तिकने चोरी केल्याचं सत्य देशपांडे सरांसमोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. पण दीपूने त्यांना अडवले आणि कार्तिक-सानिकाला सुधारण्याची एक संधी देण्याची मागणी केली. त्यानुसार देशपाडे सरांनी कार्तिक-सानिकाला सुधारण्याची एक संधी दिली आहे.
कार्तिक करणार नव्याने सुरुवात
देशपांडे सरांनी कार्तिकला सुधारण्याची एक संधी दिली आहे. त्यामुळे कार्तिक आता नव्याने सुरुवात करणार आहे. कंपनीचे कागदपत्र, गाडीची चावी या सगळ्या गोष्टींवर इंद्राचा हक्क असल्याने कार्तिक त्या सर्व गोष्टी इंद्राला देतो. तसेच या पुढे कोणत्याही कारस्थानात सानिकाला मदत न करण्याचे ठरवतो. कार्तिकचं हे बदललेलं रूप पाहून सर्वांनाच आनंद झाला आहे.
'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
'मन उडू उडू झालं' जागी 'तू चाल पुढं' होणार सुरू
'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
संबंधित बातम्या