Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नेहाला भेटण्यासाठी यशला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यश-नेहाच्या नात्यात दुरावा येत आहे. दरम्यान सिम्मी काकूदेखील यशला लुबाडताना दिसणार आहेत. 


यश प्रेमात पडल्याने यशच्या घरी त्याच्या आणि नेहाच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. यशची सिम्मी काकू नेहासाठी महागड्या साड्या आणि दागिने घेण्याचे ठरवते. पण यासाठी ती यशकडूनच पैसे घेते. अशाप्रकारे यशला सिम्मी काकू चांगलेच लुबाडते.





नेहाच्या आयुष्यात यश आल्याने तिचे परीकडेदेखील दुर्लक्ष होत आहे. पण आता नेहा आणि यश परीकडे लक्ष देण्याचे ठरवतात. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Sharmaji Namkeen : ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार; ‘शर्माजी नमकीन’ची रिलीज डेट जाहीर


Tanu Weds Manu 3 : 'तनु वेड्स मनु 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; 'या' कलाकारासोबत कंगना करणार रोमान्स?


Garam Kitly : CID मधील दया करतोय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'गरम किटली' मध्ये साकारणार प्रमुख भूमिका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha