Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रमला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील अभिनेता समीर चौघुले (Samir Choughule) त्याच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. समीरचा चाहता वर्ग मोठा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave) नुकतीच समीरबाबत एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुबोधनं समीरचं कौतुक केलं आहे.
सुबोधनं शेअर केली खास पोस्ट
सुबोधनं सोशल मीडियावर एका रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. या रांगोळीमध्ये एकीकडे समीर दिसत आहे तर दुसरीकडे 'कॉमेडी किंग' चार्ली चॅपलिन दिसत आहे. हा फोटो शेअर करुन सुबोधन त्याला कॅप्शन दिलं,'समीर मित्रा ही रांगोळी बघून खूप अभिमान वाटला तुझा.आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे. खूप प्रेम.' या पोस्टला अभिनेत्री अमृता सुभाषनं 'कमाल' अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी सुबोधच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
पाहा पोस्ट:
समीर चौघुलेसोबतच विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो बरोबरच 'फू बाई फू' आणि 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोमध्ये देखील समीने काम केले आहे. त्याने मुंबई मेरी जान, अजचा दिवस माझा, अ- पेईंग घोस्ट, विकून टाक आणि मुंबई टाईम या चित्रपटामध्ये समीरनं प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
'आयुष्यातील सुवर्ण क्षण...'; लता मंगेशकरांकडून समीर चौघुलेला खास भेट