Maharashtrachi Hasyajatra:  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या  छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला  प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  सध्या   ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील अभिनेता दत्तू मोरेची सोशल मीडियावर चर्चा होता आहे. दत्तू मोरे हा विवाह बंधनात अडकला आहे. दत्तूनं नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. 


दत्तू मोरेनं त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'जस्ट मॅरीड'. या फोटोमधील दत्तू आणि त्याच्या पत्नीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. फोटोमध्ये दत्तू आणि त्याच्या पत्नीचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. 






रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, निखिल बने,पृथ्वीक प्रताप या   ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील कलकारांनी दत्तूच्या पोस्टला कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत.






दत्तू हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. तो वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर  28.1K फॉलोवर्स आहेत. दत्तू हा काही दिवसांपूर्वी त्याच्या चाळीमधील घरामुळे चर्चेत होता. दत्तू हा ठाण्यातील रामनगर भागातील एका चाळीत राहतो. या चालीला दत्तूचं नाव देण्यात आलं आहे. दत्तूनं काही दिवसांपूर्वी एका वर्तमान पत्रामध्ये आलेल्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, ' खरंतर ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण काही वेगळंच प्रेम आहे आमच्या नगरातल्या लोकांचं माझ्यावर (चाळीतल्या लोकांच तर फारच) आणि त्या सगळ्यांचा मी फार ऋणी राहीन ज्यांनी आज पर्यंत मला आज एवढं प्रेम दिलं,कौतुकाची थाप दिली.असच प्रेम करत रहा. तुमच्या प्रेमामुळे एक वेगळीच ऊर्जा येते आणि यात अजून एक फार मोठा वाटा आहे तो आमच्या "महाराष्ट्रची हास्य जत्रा"( MHJ )फॅमिलीचा आणि सोनी मराठी चॅनलचा.'


'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी  करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत. 


 


Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रामधील दत्तू मोरेच्या राहत्या चाळीचं नाव 'दत्तू चाळ'; पोस्ट शेअर करत म्हणाला,'माझ्यावर चाळीतल्या लोकांचं प्रेम '