Anupama Serial Latest Update : रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) यांच्या 'अनुपमा' (Anupama) या मालिकेत दिवसेंदिवस रंजक ट्विस्ट येत आहेत. मालिकेचा आगामी भाग खूपच नाट्यमय असणार आहे. एकीकडे काव्याची गुडन्यूज ऐकून समर संतापणार आहे. तर दुसरीकडे मायाच्या वेडेपणाला अनुज सडेतोड उत्तर देताना दिसणार आहे. 


'अनुपमा' या मालिकेत समर आणि डिंपी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. डिंपीने शाह हाऊसमध्ये तिच्या हटके अंदाजात गृहप्रवेश केला आहे. दरम्यान काव्या आणि वनराज आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज सर्वांना देतात. काव्या आणि वनराजची गुडन्यूज ऐकल्यानंतर डिंपी आणि समर मात्र भडकणार आहेत. 


काव्याची गुडन्यूज ऐकून समर संतापला


काव्याची गुडन्यूज ऐकून तोषु खूपच आनंदी आहे. पण काव्या आणि समरला मात्र हे पटलेलं नाही. मुलाच्या लग्नात वडिलांनी दिलेली गुडन्यूज ऐतून समर संतापला आहे. त्यामुळे आता अनुपमा ही परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता शाह कुटुंबियांना गुडन्यूज सहन न झाल्याने काव्या आता दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेणार आहे. 






मायाच्या वेडेपणाला अनुजचं सडेतोड उत्तर


'अनुपमा' मालिकेत पुढे पाहायला मिळेल की, शाह हाऊसमधील परिस्थिती शांत केल्यानंतर अनुपमा तिच्या घरी जाते. तर दुसरीकडे कपाडिया हाऊसमध्ये अनुजला अनुपमाची आठवण येत आहे. दरम्यान माया त्याच्याकडे येते आणि म्हणते,"संपूर्ण लग्नात अनुपमा आणि तुझ्याकडे माझं लक्ष होतं. मला माहिती आहे तुझं अनुपमावर प्रेम आहे. पण मला हे कळत नाही की अनुपमाकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाही". आता अनुज मायला काय उत्तर देणार हे आजच्या भागात कळेल. 


'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातही ही मालिका सुपरहिट आहे. 


संबंधित बातम्या


Anupama : डिंपलच्या येण्याने शाह हाऊसमध्ये येणार नवं वादळ; वनराज सर्वांना देणार काव्याची गुड न्यूज