Priya Bapat आणि Umesh Kamat यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण; प्रियानं दिल्या उमेशला खास शुभेच्छा!
प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना आवडते तितकीच ऑफस्क्रीनदेखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. (Photo:@priyabapat/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज या लाडक्या जोडीच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नातील उखाण्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo:@priyabapat/IG)
लग्नापासून आतापर्यंत दोघांच्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ प्रिया-उमेशने शेअर केला आहे. प्रिया आणि उमेशने 2011 साली आपली लग्नगाठ बांधली होती. (Photo:@priyabapat/IG)
प्रियाने शुभेच्छा देताना म्हटले आहे, मिस्टर कामत एक दशक झालं असून आजन्म बाकी आहे. दिवसागणिक माझं तुझ्यावरचं प्रेम वाढत आहे.(Photo:@priyabapat/IG)
प्रिया-उमेशची नुकतीच 'आणि काय हवं' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यात प्रियाने जुईचे पात्र साकारलेले होते. तर उमेश साकेतची भूमिका साकरत होता. त्या दोघांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. (Photo:@priyabapat/IG)
'आणि काय हवं', 'टाईप प्लीज', 'शुभंकरोती', 'दादा एक गुड न्यूज आहे' असे अनेक प्रोजेक्ट दोघांनी एकत्र मिळून केलेले आहेत. (Photo:@priyabapat/IG)
प्रिया आणि उमेश दोघेही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. त्यांनी शेअर केलेले दोघांचे एकत्र फोटो चाहत्यांना देखील आवडत असतात.(Photo:@priyabapat/IG)