मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने कलर्स मराठी वाहिनीच्या '2 मॅड' नावाच्या शोवर आक्षेप घेतला आहे. कलर्स वाहिनीने नृत्य विषयक कार्यक्रमात शिवाजी महाराज आणि अफजल खानचं नृत्य चित्रित केलं आहे.

या नृत्यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आक्षेप घेतला आहे. हा एपिसोड 27 आणि 28 फेब्रुवारीला प्रसारित होणार आहे. मात्र हा कार्यक्रम प्रसारित करु नये, अशी मागणी करणारं पत्र मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कलर्स वाहिनीला दिलं आहे.



शिवरायांचा अपमान महाराष्ट्र चित्रपट सेना खपवून घेणार नाही, असा इशाराही अमेय खोपकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता कलर्स वाहिनी त्यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.