मुंबई : गेल्या वर्षातील आमीर खान आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'दंगल' या सुपरहिट सिनेमातून कुस्तीपटू गीता फोगाटच्या जीवनावरील बायोपिकमधून महिला सबलीकरणाची शिकवण दिली होती. आता आमीर आणि दिग्दर्शनक नितेश तिवारी यांची जोडगोळी एका जाहिरात कॅम्पेनच्यानिमित्त पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी तयार केलेल्या 48 मिनिटांच्या जाहिराती कॅम्पेनमधून पुन्हा महिला सबलीकरणाची शिकवण दिली आहे.


आमीरची ही जाहिरात फिल्म देशातील स्त्री-पुरुष असमानतेवर भाष्य करते. ही फिल्म स्टार प्लसच्या 'नई सोच' या अभियानाचा भाग आहे.

एकूण 48 सेकंदाच्या या छोट्याशा फिल्ममध्ये आमीरला एका लहान शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील वडिलांच्या भूमिकेत दाखवलं आहे. आमीर या नव्या भूमिकेतून आपल्या मुली मिठाईचा व्यवसाय कशाप्रकारे सांभाळतात हे दाखवलं आहे.

आमीरने यावर बोलताना सांगितले की, या फिल्मच्या माध्यमातून देशातील ज्या मुली आणि वडिलांनी बदल घडवून आणला, त्यांचे यातून आभार मानले आहेत.'' असं म्हणलं आहे. आमीरने ही फिल्म फेसबुक आणि ट्विटरवरुनही शेअर केली आहे.

व्हिडिओ पाहा