Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding :   अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) आणि तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde ) यांची लगीनसराई सध्या सुरु आहे. नुकतच त्यांच्या साखरपुड्याचे आणि हळदीचे व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीत उतरत आहे. या जोडप्यांच्या लग्नासाठी कलाविश्वातली मित्रमंडळी देखील हजर झाली आहे. अभिनेत्री अनघा अतुल, ऋतुजा बागवे, रसिका सुनील या सगळ्यांनी या दोघांच्या लग्नाच्या विधींमध्ये तितकीच धम्माल केल्याचं पाहायला मिळालं. भगरे गुरुजींची लेक आणि अभिनेत्री अनघा अतुल (Anagha Atul) हीचा असा एक धम्माल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


सिद्धार्थ आणि तितिक्षा या दोघांनीही त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोघेही जण अत्यंत गोड दिसत होते. पण या व्हिडिओच्या शेवटी अभिनेत्री अनघा अतुल हीने धम्माल केल्याचं पाहायला मिळालं आहे. अनघाने माईकवरुन बोडके आणि तावडे परिवार पटापट जेवायला बसा, पत्रावळ्या वाढल्या आहेत, अशी अनाउंसमेंट केली. तिच्या या कृत्यावर चाहत्यांनी देखील पसंती दर्शवली आहे. 


सिद्धार्थ आणि तितिक्षा अडकणार विवाहबंधनात


तितिक्षा तावडेने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या मित्र मैत्रींणींनी देखील तितिक्षा आणि सिद्धार्थच्या केळवणाचा घाट घातला. सगळे विधी उरकल्यानंतर आज म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी तितिक्षा आणि सिद्धार्थ हे लग्नबंधनात अडकणार आहेत. 


अशी आहे सिद्धार्थ तितिक्षाची लव्हस्टोरी (Titeeksha Tawde Siddharth Bodke Lovestory)


तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके 'तू अशी जवळी रहा' ही मालिका करत होते. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मालिका संपली पण त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते रिलेशनमध्ये आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.


तितीक्षाने सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिद्धार्थचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याआधी तो 'दृश्यम 2' या बॉलिवूडपटात झळकला होता. 






ही बातमी वाचा : 


Titeeksha Tawde and Siddharth Bodke Wedding : जेव्हा सिद्धार्थने सरप्राईज देत तितिक्षाला घातली लग्नाची मागणी, लग्नाआधी शेअर केला गोड व्हडिओ