Chala Hawa Yeu Dya Kushal Badrike Post : कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. आता रोमँटिक अंदाजात त्याने खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


कुशल बद्रिके सध्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावरदेखील तो चांगलाच अॅक्टिव्ह आहे. आता या वर्षातला पहिला पाऊस पडला असून विनोदवीराने रोमँटिक अंदाजात खास पोस्ट लिहिली आहे.


कुशलची पोस्ट काय आहे? (Kushal Badrike Post)


कुशलने लिहिलं आहे,"आता पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी, कोसळू देतो त्याला तुझ्या आठवांसारखा. मात्र मनमोकळा श्वास घेतो भिजल्या मातीचा... तुझ्या केसांसारखा....(सुकुन)". कुशलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 






कुशलच्या पोस्टवर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स


कुशल बद्रिकेच्या पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. पाऊस आला का गावाकडे पाठवा प्रयेसी नहीं पण जमीन तहानली आहे, मी पण हे वाक्य चोरणार आणि माझा फोटो टाकून स्टेटस ठेवणार, दादाssss तुमचे शब्द अगदी काळीज चिरत जातात .. खरंच, सुकुन, कुशल तू हळूहळू कवी होत आहेस, तुझ्याकडे पण आला वाटतं, हृदयस्पर्शी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर अंशुमन विचारेने लिहिलं आहे,"चल झुटे". 


कुशल बद्रिकेने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोटा पडदा गाजवण्यासोबत त्याने सिनेमे आणि वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. 


कुशल बद्रिके सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. छोट्या पडद्यावर विनोदनिर्मिती करणारा कुशल सोशल मीडियावर मात्र गंभीर पोस्ट करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होतो. त्यामुळे त्याच्या पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असता.


संबंधित बातम्या


Kushal Badrike : "महाराजांचं नेतृत्व मनात नाही रक्तात भिनायला हवं"; लहान मुलं आणि पालकांना उद्देशून कुशल बद्रिकेची खास पोस्ट