Karan Kundrra: अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) हा इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तो सध्या ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) दिसत आहे. ‘बिग बॉस’मध्ये करणला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले असून, तो ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला आहे. आज बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये हा सीझन कोण जिंकणार, हे स्पष्ट होणार आहे.


करणने बिग बॉसच्या संपूर्ण सीझनमध्ये भरपूर खेळ खेळले आहेत, ज्यामुळे तो शेवटपर्यंत शोमध्ये राहू शकला आहे. यासोबतच तेजस्वी प्रकाशसोबतच्या (Tejaswwi Prakash) त्याच्या प्रेमकथेनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. कधी कामामुळे, तर कधी लव्ह लाईफमुळे करण त्याच्या करिअरमध्ये नेहमीच चर्चेचा भाग राहिला आहे.


टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात


करण कुंद्राने टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा पहिला शो 'कितनी मोहब्बत है' सुपरहिट ठरला होता. या शोमध्ये तो अभिनेत्री कृतिका कामरासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. कृतिका आणि करण या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. शो दरम्यानच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकमेकांना डेट करू लागले.


'कितनी मोहब्बत है' नंतर करण ‘जरा नचके देखा’, ‘बेताब दिल की तमन्ना’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसला आहे. त्याने काही रिअॅलिटी शो देखील होस्ट केले आहेत. तो ‘रोडीज’मध्ये दिसला आहे. याशिवाय त्याने अनुषा दांडेकरसोबत ‘लव्ह स्कूल’ हा शो होस्ट केला आहे.


लव्ह लाईफ


करण कुंद्रा त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा, त्याच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत राहिला आहे. कृतिका कामरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, करण अनुषा दांडेकर आणि गौहर खानसोबत देखील रिलेशनशिपमध्ये होता. 2019 मध्ये अनुषा आणि करणचे ब्रेकअप झाले होते. अनुषाने ब्रेकअपनंतर करण कुंद्रावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha