मुंबई: टीव्ही अभिनेता के. के. गोस्वामी हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है!' मध्ये दिसणार आहे. या मालिकेत गोस्वामी आपली ऑनस्क्रीन मुलीसाठी नवरा मुलगा शोधताना दिसणार आहे.


गोस्वामी म्हणाला की, 'या शोचे डायलॉग फारच चांगले लिहले जातात. जेव्हा हे डायलॉग मी वाचले तेव्हा स्वत:लाच प्रचंड हसू आलं. मला आशा आहे की, यामुळे प्रेक्षकांनाही नक्कीच आनंद मिळेल'

'भाबीजी घर पर है' हा शो अॅण्ड टीव्हीवर प्रसारित होतो. यामध्ये सौम्या टंडन, आशिफ शेख, रोहिताश गौड आणि शुभांगी अत्रे हे कलाकार आहेत. या सगळ्याच टीमसोबत शुटींगच्या वेळेस आपण बरीच धमाल करीत असल्याचं गोस्वामीनं सांगितलं.