Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या  कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  हे उपस्थित राहणार आहे. या एपिसोडमध्ये राज ठाकरे हे त्यांच्या काही आठवणी सांगताना दिसणार आहेत. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहेत की, राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करणार आहेत.  


‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अवधूत हा राज ठाकरे यांना म्हणतो,  'हा जादूचा फोन आहे. हा फोन डायरेक्ट कनेक्ट होतो. तुमच्या मनात जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्ही फोन करु शकता.' यावर राज ठाकरे म्हणतात, "मला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बोलायचं आहे. माझी इच्छा आहे की, त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की, तुम्ही कशासाठी झगडलात?"


पाहा प्रोमो: 






खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात राज ठाकरेंनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध, बारसू रिफायनरी, मनसे पक्षाची वाटचाल, त्यांच्यावर होणारी टीका यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. 


'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांना कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहेत? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  4 जून 2023 रोजी रविवारी 9 वाजता 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात लावणार हजेरी


'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील लवकरच हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, 'खुपते तिथे गुप्ते'  कार्यक्रमातील प्रश्नांना खूप धार आहे, पण मी पण तयार आहे.'


संबंधित बातम्या


Khupte Tithe Gupte : 'खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अजित पवार यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, 'बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं काय होईल?'; प्रोमो व्हायरल